Fact Check: 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत मिळणार 2.20 लाख रुपयांची रोख रक्कम व 25 लाखांपर्यंतचे कर्ज; जाणून घ्या या व्हायरल मेसेज मागील सत्य

एका यूट्यूब व्हिडिओमध्ये हा दावा केला जात आहे की केंद्र सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 2 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम देत आहे तसेच 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे

Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

एकीकडे इंटरनेट हे जलद गतीने माहिती पोहोचवण्याचे साधन बनले आहे, तर दुसरीकडे त्याच्या वापरामुळे चुकीची माहितीही लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. अनेकदा दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवणूकही केली जात आहे. आता सोशल मीडियावर असाच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत 2 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम मिळणार आहे, तसेच एसबीआय कडून 25 लाखांपर्यंतचे कर्जही दिले जाणार आहे असे यात म्हटले आहे.

मोठ्या प्रमाणात हा संदेश व्हायरल होत असून, लोक त्यावर विश्वासही ठेऊ लागले आहेत. एका यूट्यूब व्हिडिओमध्ये हा दावा केला जात आहे की केंद्र सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 2 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम देत आहे तसेच 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. परंतु आता अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

PIB Fact Check ने ट्वीट करत हा संदेश खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नसल्याची माहितीही दिली आहे. याआधी कोरोना विषाणूच्या उपचारासाठी सरकार तरुणांना 4000 रुपये देत आहे. प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना अंतर्गत ही आर्थिक मदत केली जात असल्याचा दावा केला गेला होता. परंतु तो संदेशही खोटा ठरला होता. (हेही वाचा: Fact Check: 'व्यवहार करण्यापूर्वी ATM वर दोनदा कॅन्सल बटण दाबल्याने कार्डचा पिन चोरीला जात नाही'; Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य)

दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.