Fact Check: NRA कडून 8 लाखाहून अधिक पदांसाठी परीक्षा न घेता नोकरभरती? PIB ने केला खुलासा
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगत अनेकजण त्यांच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. परंतु, अशातच सोशल मीडियावर एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे.
सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगत अनेकजण त्यांच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. परंतु, अशातच सोशल मीडियावर एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे. यात राष्ट्रीय भरती एजन्सी (National Recruitment Agency) नोकरीशिवाय भरती करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखांहून अधिक पदांसाठी परीक्षेशिवाय भरती करण्यात येणार आहे, असा दावा करणारा युट्युब व्हिडिओ (YouTube Video) समोर आला आहे. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या व्हायरल व्हिडिओमागील सत्याचा खुलासा केला आहे.
व्हायरल व्हिडिओ मधील दावा: एका युट्युब व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की राष्ट्रीय भरती एजन्सीने 8 लाखाहून अधिक पदांसाठी परीक्षेशिवाय भरती काढली आहे.
पीआयबी फॅक्ट चेक: हा दावा फेक आहे. राष्ट्रीय भरती एजन्सीने कोणत्याही प्रकारच्या सरकारी पद भरतीसाठी जाहीरात जारी केलेली नाही.
Fact Check By PIB:
व्हायरल व्हिडिओमधील दावा फेक आणि निराधार असून अशा प्रकारची नोकरभरती NRA कडून करण्यात येत नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. व्हायरल फेक न्यूजमागील सत्याचा उलघडा पीआयबी फॅक्ट चेकद्वारे सातत्याने करत असते. तसंच खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात येते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)