Fact Check: कतार ची राजकन्या 7 पुरुषांसोबत अश्लील कृत्य करताना पकडली गेली? जाणून घ्या सत्य

या व्हायरल न्युज मागील सत्य जाणून घ्या.

Tweets Claiming Qatar Princess Sheikha Salwa’s Sexual Scandal With Seven Men Are Fake (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे लागू करण्यात आलेल्या या लॉक डाऊन (lockdown) काळात अनेकजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत. अशावेळी फेक न्यूज (Fake News) तसेच अफवांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. अलीकडेच अशी एक आणखीन नवी बातमी सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर चर्चेत आहे. कतार देशाची राजकन्या शिखा सेल्वा (Shikha Selva) ही युके मधील एक्सेलसियर लंडन हॉटेल मध्ये 7 पुरुषांसोबत लैंगिक अश्लील कृत्य (Orgy) करताना पकडली गेली असा दावा या बातमीतून करण्यात आला आहे. एका वृत्तपत्रात ही बातमी आली असून त्याच कात्रणाचा फोटो शेअर करून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही कमेंट्स अत्यंत वाईट असून काहींनी मात्र 'तिने स्वतंत्र पणे जे करायचे ते केले याचे कौतुक आहे' अशा आशयातही यावर भाष्य केले आहे. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असताना याची सत्यता तपासून पाहणे हे देखील गरजेचे आहे, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण?कोरोना व्हायरस नीचे से भी घुस सकता है, टांगे प्रोटेक्ट करो! पाकिस्तानी मंत्री डॉ. फिरदौस आशिक अवान यांचा अजब सल्ला (Watch Video)

एका ट्विटर युजरने अलीकडेच एका वृत्तपत्रातील बातमीचा फोटो शेअर करत ही संबंधित पोस्ट केली होती, या बातमीचे शीर्षक 'Qatari Princess Caught In Orgy With 7 Men' असे आहे. यावर कॅप्शन देताना या युजरने म्हंटले आहे की, "इस्लामिक देशात वर्षानुवर्षे महिलांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे आता स्वातंत्र्य मिळताच त्यांनी असे कृत्य केले आहे, त्यांनी स्वतःच्या आवडीचा निर्णय घेतला यासाठी आनंद होत आहे."या पोस्ट ला अनेकांनी शेअर केले आहे.

पहा ट्विट

मात्र या पोस्ट बाबत पडताळणी केली असता, ही बातमी संपूर्णतः खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रथमतः या बातमीत जो फोटो वापरण्यात आलाय तो कतारची राजकन्या शिखा सेल्वा यांचा नसून दुबई स्थित अल मजरु होल्डिंग्स (Al Mazrui Holdings) ची मुख्य अधिकारी आलिया अल मज्रुवी यांचा आहे. ही पोस्ट 2016 ची असल्याने आता याचा काहीच संबंध नाही.

पहा ट्विट

विशेष म्हणजे ज्या बातमीचे कात्रण या पोस्ट मध्ये लावण्यात आले आहे ते फायनान्शियल टाइम्सच्या नावे आहे. मात्र या वृत्तपत्राने अशी कोणतीही बातमी छापली नसल्याचे सांगितले आहे.