Bhushi Dam in Lonavala Over The Weekend Fake Viral Video: सोशल मीडियामध्ये भूशी डॅम वर गर्दीचा कथित व्हिडिओ व्हायरल; लोणावळा मधील नव्हे तर गर्दी राजस्थानच्या गोवटा डॅम वरील
यंदा पावसाच्या दिवसांत एरवी गर्दीने गजबजलेल्या भुशी डॅमची मज्जा अनेकजण मिस करत आहे. सध्या सोशल मीडीयात लोणावळा जवळील भुशी डॅमचे कथित व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्रामध्ये आता कोरोना व्हायरस फैलावावर नियंत्रण आल्याने विशिष्ट प्रमाणात रूग्णसंख्या नेहमी वाढत असताना प्रशासनाकडून अजूनही सोशल डिस्टन्सिंग पाळत आणि गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये आता कोरोना व्हायरस लॉकडाऊन लागू होऊन 5 महिने उलटले आहेत. नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केले असल्याने आता अनेकजण घरात बसूनच टाईमपास करत आहेत. यंदा पावसाच्या दिवसांत एरवी गर्दीने गजबजलेल्या भुशी डॅमची मज्जा अनेकजण मिस करत आहे. सध्या सोशल मीडीयात लोणावळा जवळील भुशी डॅमचे कथित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये पोलिस पर्यटकांना हटकताना दिसत आहेत. पण नेटकरी जरी हे व्हिडिओ लोणावळा जवळील भुशी डॅमचे असल्याचं सांगत असले तरीही ते वास्तवात राजस्थान मधील गोवटा डॅम मधील आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियात पसरत असलेल्या अफवांच्या जाळ्यात अडकू नका.
आजकाल भावनेपोटी किंवा सामान्यांच्या भावनांसोबत खेळून खोटे व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये अनेकदा तथ्य न नपासता ते फॉरवर्ड करण्याची पद्धत असल्याने खोटे व्हिडिओ झपाट्याने पसरतात.
मुंबई पुणे जवळ असणार्या लोणावळा येथील भुशी डॅमवर ऐरवी पावसाळ्यात पर्यटकांची तोबा गर्दी असते. अनेकजण वीकेंडला मज्जामस्ती करण्यासाठी हमखास येतात. मात्र यंदा कोरोना संकटामुळे अशाप्रकारे बाहेर पडायला, वर्षापर्यटनाला बंदी आहे. सोशल मीडीयावर सध्या केला जाणारा भुशी डॅमवर वीकेंडला पर्यटकांची गर्दी हा दावा खोटा आहे.
ट्वीटर वरील व्हिडिओ
मात्र राजस्थान मधील एका वृत्तपत्रकाने तेथील स्थानिक डॅमवर पर्यटकांची असणारी तोबा गर्दी दाखवणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे ही गर्दी लोणावळा मधील नसून राजस्थानातील आहे. दरम्यान युट्युब वरील एक व्हिडिओ देखील त्याचा दाखला देत आहे.
दरम्यान भारतामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा 32 लाखांच्या पार गेला आहे. देशभरात सुरक्षित राहण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळत पुन्हा जनजीवन सामान्य करणं गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हांला देखील हा व्हिडिओ लोणावळा मधील असल्याचं सांगण्यात आलं असेल तर ते पाठवणार्याला ही गोष्ट लक्षात आणून द्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)