Fact Check: मोदी सरकार नागरिकांच्या खात्यात 2 लाख 67 हजार रुपये जमा करत असल्याचा मेसेज व्हायरल; PIB ने केला खुलासा
हा मेसेज एका स्कॅम अंतर्गत पाठवण्यात आला आहे.
सरकारी योजने (Govt Yojana) अंतर्गत तुमच्या अकाऊंटमध्ये 2 लाख 67 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला आहे का? आणि तो वाचून तुम्ही आनंदून गेलात? तर हा आनंद फार काळ टिकणारा नाही. हा मेसेज एका स्कॅम (Scam) अंतर्गत पाठवण्यात आला आहे. त्यामुळे याद्वारे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे यावर विश्वास ठेऊ नका. तसंच त्यातील लिंकवर क्लिक करु नका. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने यामागील सत्याचा उलघडा केला आहे.
"हा मेसेज खोटा असून भारत सरकारकडून अशा कोणत्याही प्रकारची योजना सुरु नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजपासून सावध रहा," असे पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसंच अशा कोणत्याही मेसेज आल्यास ताबडतोब डिलीट करा आणि फॉरवर्ड करणे टाळा. (Fact Check: भारत सरकारकडून वर्क फ्रॉम होम ची संधी? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य)
Fact Check By PIB:
दरम्यान, अशा प्रकारचे अनेक फेक मेसेजेस सातत्याने व्हायरल होत असतात. कोविड-19 संकटकाळात तर अशा मेसेजेंना उधाण आले होते. मात्र यामागील सत्याचा खुलासा पीआयबीकडून करण्यात येतो. तसंच सावधगिरीचा इशाराही सरकारने वारंवार दिला आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष न करता सतर्क राहणे नागरिकांचे कर्तव्य आहे.