Fact Check: पीएम मुद्रा योजने अंतर्गत लोन घेण्यासाठी लीगल चार्जसाठी आकारावे लागतील 2,150 रुपये? PIB ने केला व्हायरल Approval Letter मागील खुलासा

गेल्या काही काळापासून कमी झालेला कोविड-19 चा संसर्ग आता पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यात अजूनही फेक न्यूजची मालिका सुरुच आहे.

Fake News (Photo Credits-PIB Fact Check)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाला सुरुवात झाल्यापासून फेक न्यूजचे (Fake News) प्रस्थही वाढू लागले. गेल्या काही काळापासून कमी झालेला कोविड-19 चा संसर्ग आता पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यात अजूनही फेक न्यूजची मालिका सुरुच आहे. आता यात अजून एका खोट्या बातमीची भर पडली आहे. पीएम मुद्रा योजने (PM Mudra Yojna) अंतर्गत लोन (Loan) घेण्यासाठी लीगल चार्ज (Legal Charge) म्हणून 2,150 रुपये आकारण्यात येतील, असा दावा नव्याने व्हायरल होणाऱ्या बातमीत करण्यात आला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) या मागील खुलासा केला आहे.

अर्थ मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या अप्रुव्हल लेटर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पीएम मुद्रा योजनेअंतर्गत लोन घेण्यासाठी 2150 रुपये आकारावे लागतील असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच असे कोणतेही लेटर अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Fact Check: 'स्त्री स्वाभिमान योजने'अंतर्गत केंद्र सरकार महिला बँक खात्यात 1 लाख 24 हजार रुपये जमा करीत आहे? PIB ने केला खुलासा, जाणून घ्या)

Fact Check By PIB:

यापूर्वी प्रधानमंत्रीी क्रेडिट योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करण्यात येतील, असा दावा एका युट्युब व्हिडिओतून करण्यात आला होता. मात्र व्हायरल होणारा हा व्हिडिओ फेक असल्याचे पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले होते. अशा प्रकारच्या अनेक बातम्या यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. याद्वारे नागरिकांची दिशाभूल, फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच व्हायरल मेसेजेसवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif