Fact Check: कलम 341 हटवण्याचा सरकारचा विचार? जाणून घ्या व्हायरल WhatsApp Message मेजेस मागील सत्य
सरकार कलम 341 काढून टाकणार असल्याचा व्हायरल मेसज सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. सरकारने हे कलम हटवल्यानंतर एससी, एसटी आणि ओबीसी कॅटेगरीच्या सर्व सुविधा रद्द करण्यात येतील, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.
सरकार कलम 341 (Section 341) काढून टाकणार असल्याचा व्हायरल मेसज सध्या सोशल मीडियावर (Social Media) फिरत आहे. सरकारने हे कलम हटवल्यानंतर एससी (SC), एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) कॅटेगरीच्या सर्व सुविधा रद्द करण्यात येतील, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. या कॅटेगरी मधील सर्व व्यक्तींनी सरकारविरुद्ध लढण्यास तयार राहण्याचे आवाहन देखील या मेसेजमध्ये करण्यातस आले आहे. (Fact Check: कोविड-19 ची नुकसान भरपाई म्हणून 1.60 कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी RBI कडून Personal आणि Bank Account डिटेल्सची मागणी? PIB ने सांगितले सत्य)
व्हायरल होणाऱ्या या व्हॉट्सअॅप मेसेजची पडताळणी प्रेस इनफार्मेशन ब्यूरोकडून (Press Information Bureau) करण्यात आली आहे. त्यानंतर हा व्हायरल मेसेज फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून कलम 341 हटवण्याबाबत कोणताही निर्णय किंवा आदेश देण्यात आलेला नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.
Fact Check By PIB:
सरकार आणि इतर अनेक संस्थांनी अशा व्हायरल होणाऱ्या खोट्या मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन लोकांना केले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या चुकीच्या माहितीवर लोकांनी विश्वास ठेऊ नये. प्रत्येक मेसेजची तपासणी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करावी. सरकारकडून निघालेले आदेश किंवा नोटीफिकेशन यांच्यावर विश्वास ठेऊन इतर कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)