Fact Check: नोकरीसाठी सुरक्षा रक्कम म्हणून 14,500 रुपये भरण्यासाठी डिजिटल इंडिया मिशन कडून नियुक्ती पत्रक जारी? काय आहे सत्य?
यात आता अजून एका बातमीची भर पडली आहे. सोशल मीडियावर डिजिटल इंडिया मिशन द्वारे जारी करण्यात आलेले एक नियुक्ती पत्रक वेगाने फिरत आहे. यात नोकरीसाठी सुरक्षा रक्कम म्हणून 14,500 रुपये देण्याची विनंती केली जात आहे.
कोरोना व्हायरस संकटकाळात (Coronavirus Pandemic) अनेक फेक आणि दिशाभूल करणाऱ्या न्यूज व्हायरल झाल्या. यात आता अजून एका बातमीची भर पडली आहे. सोशल मीडियावर डिजिटल इंडिया मिशन द्वारे (Digital India Mission) जारी करण्यात आलेले एक नियुक्ती पत्रक वेगाने फिरत आहे. यात नोकरीसाठी सुरक्षा रक्कम म्हणून 14,500 रुपये देण्याची विनंती केली जात आहे. दरम्यान, या फेक न्यूजमुळे (Fake News) अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. परंतु, पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) यामागील सत्य तपासत ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून या बातमीचा खुलासा केला आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "हे पत्रक फेक आहे. डिजिटल इंडियाने असे कोणत्याही प्रकारचे पत्रक जारी केलेले नाही." (Fact Check: RBI ने 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याने ATM मध्ये केवळ 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध? काय आहे सत्य? जाणून घ्या)
व्हायरल बातमी मधील माहिती: डिजिटल इंडिया मिशन द्वारे जारी करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रकात नोकरीच्या सुरक्षेसाठी 14,500 रुपये देण्याची विनंती केली जात आहे.
पीआयबी फॅक्ट चेक: हे पत्रक फेक आहे. डिजिटल इंडियाने असे कोणत्याही प्रकारचे पत्रक जारी केलेले नाही.
Fact Check by PIB:
सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होणाऱ्या अशा प्रकारच्या फेक न्यूजवर विश्वास न ठेवता त्यामागील सत्य जाणून घेणे गरजेचे आहे. खोट्या बातम्यांमुळे दिशाभूल किंवा फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सर्वप्रथम अशा प्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड करणे थांबवा आणि सत्य जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या.