Fact Check: नेदरलँडमधील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता अनिवार्य? पाहा व्हायरल होत असलेल्या माहितीमागील सत्य
हा दावा आणि सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या इमेजेस सत्य आहेत का किंवा त्यातील वास्तवता काय याचा लेटेस्टलीने शोध घेतला आहे.
नेदरलँड्स (Netherlands) मधील शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून डच (Dutch) विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता (Bhagavad Gita) सक्ती केली गेली आहे असा दावा केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हा दावा आणि सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या इमेजेस सत्य आहेत का किंवा त्यातील वास्तवता काय याचा लेटेस्टलीने शोध घेतला आहे. यादरम्यान करण्यात आलेल्या पडताळणीत असे समोर आले की, सोशल मीडियात शेअर केले जाणारे हे फोटो, इमेजेस अथवा दावे चुकीचे असून त्यात कोणतीही सत्यता नाही आहे. काही लोकांनी हे पोटोज स्वत:च तयार करून बातमी व्हायरल केली असल्याचे समोर आले आहे. नेदरलँड्स शासकीय अधिकृत वेबसाइटवर अनिवार्य विषयांची यादी आहे ज्यामध्ये भगवतगीता नाही आहे. (Fact Check: खरोखरच अमेरिकेने केला भारताचा गौरव? 100 डॉलरच्या नोटेवर Mahatma Basaveshwar यांचा फोटो? पाहा व्हायरल फोटोंमागील सत्य)
खरं तर, हा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही वर्षांपासून केला जात आहे , मुख्यतः ट्विटर आणि फेसबुकवर. 2016 मध्ये देखील अशीच एक पोस्ट समोर आली होती. आम्ही आमच्या सर्व वाचकांना या बातमीमागील सत्यता घेण्यासाठी विनंती करतो. नेदरलँड्सने भगवद्गीता शाळांमध्ये अनिवार्य केली आहे हे पूर्णपणे खोटे आहे. नेदरलँड्समध्ये प्राथमिक शिक्षणासाठी अनिवार्य विषयांची यादी नेदरलँड्स सरकारच्या वेबसाइटवर सहज उपलब्ध आहे. अनिवार्य विषयांमध्ये डच, इंग्रजी, अंकगणित आणि गणित, सामाजिक आणि पर्यावरणीय अभ्यास, सर्जनशील अभिव्यक्ती आणि खेळ व हालचाल यांचा समावेश आहे. नेदरलँड्समधील प्राथमिक शिक्षणासाठी सक्तीचा विषय / मॉड्यूल म्हणून भगवद्गीतेचा संदर्भ नाही.
असे म्हटले जाऊ शकते की नेदरलँड्सने शाळांमध्ये भगवद्गीता अनिवार्य केल्याबद्दल सोशल मीडियाचा दावा हा एक फसवा आहे, आणि वेबसाइटवर पोस्ट केला गेला आहे व किमान 2016 पासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही खोटी माहिती प्रसारित केली गेली आहे. दरम्यान, लेटेस्टलीच्या पडताळणीत असेही पुढे आले की, भगवतगीता घेऊन उभ्या असलेल्या दोन युवा मुलींचे फोटो 2013 मध्ये ISKON Desire Tree या वेबसाइटवर अपलोड केले गेले होते. तसेच, वेबसाइटवर दोन मुलींच्या व्हायरल फोटोंव्यतिरिक्त इतर फोटो देखील पोस्ट केल्या आहेत.