Fact Check: खरोखरच अमेरिकेने केला भारताचा गौरव? 100 डॉलरच्या नोटेवर Mahatma Basaveshwar यांचा फोटो? पाहा व्हायरल फोटोंमागील सत्य
Fake post claims that Mahatma Basaveshwar's image has been used on $100 currency note (Photo Credits: Facebook)

अमेरिकेने केला भारताचा गौरव, 100 डॉलर्स चलनी नोटांवर (United States Currency) महात्मा बसवेश्वर (Mahatma Basaveshwa) यांचे फोटो छापल्याचा दावा सोशल मीडियाद्वारे काही लोक करत आहेत. तशा प्रकारच्या काही इमेजेसही सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. हे दावे आणि या इमेजेस सत्य आहेत का किंवा त्यातील वास्तवता काय याचा लेटेस्टली ने शोध घेतला. यावेळी करण्यात आलेल्या पडताळणीत असे समोर आले की, सोशल मीडियात शेअर केले जाणारे हे फोटो, इमेजेस अथवा दावे चुकीचे आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. काही लोकांनी या इमेजेस स्वत:च तयार केल्याचेही जाणवून आले.

अमेरिकन डॉलरच्या नोटांवर महात्मा बसवेश्वर यांचा फोटो छापल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आभार मानल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. परंतू, या दाव्यातही कोणतेही तथ्य नाही. जसे महात्मा बसवेश्वर यांचे फोटो असलेल्या त्या कथीत नोटांच्या इमेज जशा फेक आहेत तसाच हा दावाही फेक आहे. लेटेस्टली अवाहन करते की, वाचकांनी अशा प्रकारच्या दाव्यांची पडताळणी करावी. अशा प्रकारच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. वाचकांनी अशा प्रकारच्या प्रतिमा, व्हिडिओ अथवा पोस्ट स्वत:च्या जबाबदारीवर वाचाव्यात. तसेच, अशा प्रकारच्या पोस्ट पुढे फॉर्वर्ड करतानाही काळजी घ्यावी की, आपण शेअर करणारी पोस्ट वास्तवता अथवा सत्य आणि तथ्यांना अनुसरु आहे का? (हेही वाचा, Fact Check: प्लास्टिकच्या कचर्‍याने भरलेल्या नदीचा 'तो' फोटो Mithi River चा नाही; भाजपच्या Priti Gandhi यांनी शेअर केला चुकीचा फोटो)

दरम्यान, लेटेस्टलीच्या पडताळणीत असेही पुढे आले की, महात्मा बसवेश्वर यांचा डॉलर्सच्या नोटांवर असलेला फोटो हा "pho.to" नावाच्या वेबसाईटचा वापर करुन बनविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अनेक वेबसाईट आहेत. ज्याद्वारे युजर्सला मूळ फोटो एडीट करुन त्यात हवा तसा बदल करता येतो. परंतू, असे केल्याने बदल करुन तयार केलेल्या प्रतिमा, व्हिडिओ, पोस्ट या बनावटच राहतात. न्यूज मास्टर या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.

उल्लेखनीय असे की, महात्मा बसवेश्वर यांचा फोटो दिसणाऱ्या त्या सर्व नोटा एकाच क्रमांकाच्या आहेत. तसेच एकाच वेबसाईटचा वापर करुन बनविलेल्या दिसतात. तसेच, अशाच प्रकारच्या आणि त्याच क्रमांकाच्या नोटांवर इतरही काही महापुरुषांचे फोटो असल्याचे पाहायला मिळते. त्यावरुनही लक्षात येते की या प्रतिमा फेक आहेत. महात्मा बसवेश्वर हे इ.स.12 व्या शतकातील महापुरुष होते. त्यांनी समाजातील अनेक रुढी परंपरा, अंधश्रद्धा, भेदभाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले. महात्मा बसवेश्वर यांनी तेव्हा केलेले काम अत्यंत विद्रोही होते.