Fact Check: COVID-19 या बॅक्टेरियामुळे Thrombosis हा आजार होतो आणि त्यावर Aspirin गोळी घेतल्याने उपचार होतो? जाणून घ्या या व्हायरल मेसेज मागील सत्य

त्यामुळे intravascular coagulation म्हणजेच थ्रोम्बोसिस होतो आणि त्यावर Aspirin गोळी घेतल्याने उपचार होतो. काय आहे या व्हायरल मेसेज मागील सत्य जाणून घ्या..

Fake News on COVID-19 (Photo Credits: PIB Fact Check)

कोविड-19 (Covid-19) हा व्हायरस (Virus) नसून बॅक्टेरिया (Bacteria) आहे. त्यामुळे intravascular coagulation म्हणजेच थ्रोम्बोसिस (Thrombosis) होतो आणि त्यावर Aspirin गोळी घेतल्याने उपचार होतो, असा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर वेगाने फिरत आहे. तसंच Aspirin गोळी घेतल्याने कोविड-19 वर उपचार होतो आणि या उपचाराचा शोध जर्मनी मध्ये लागला. कोविड-19 हा जीवघेणा बॅक्टेरिया आहे, असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे.

पुढे मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, कोविड-19 हा बॅक्टेरिया ब्लड क्लॉट करतो आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. कोविड-19 दुसरे तिसरे काही नसून सर्वत्र पसरलेले intravascular coagulation आहे, असाही दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. कोविड-19 संदर्भात गैरसमज पसरवणारे अनेक फेक मेसेजेस या काळात व्हायरल झाले. त्यात अजून एका मेसेजची भर पडली आहे. (केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होतो? काय आहे या व्हॉट्सअॅप मेसेज मागील सत्य, जाणून घ्या)

 Fact Check by PIB:

थ्रोम्बोसिस म्हणजे काय?

थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे. याला थ्रॉम्बस असेही म्हणतात. रक्तातील हा गुठळ्या रक्तप्रवाहात अडथळा आणतात. त्याचप्रमाणे मेंदू किंवा फुफ्फुसांसारख्या महत्त्वाच्या भागांत क्लॉट आल्यास प्रकृती गंभीर होऊ शकते.

दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेजमागील तथ्यता तपासली असून हा मेसेज फेक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच कोविड-19 हा व्हायरस असून त्यावर अद्याप ठोस औषध उपलब्ध झालेले नाही असेही म्हटले आहे. कोविडपेक