Fact Check: वेलची, दालचिनी, मिरपूड, लवंगा, ओवा, हळदीच्या काढ्याने 24 तासांत बरा होईल Covid-19 चा संसर्ग? जाणून घ्या व्हायरल ऑडीओ क्लिपमागील सत्य

सोशल मिडियावर एक ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे, त्यामध्ये दावा केला आहे की वेलची, दालचिनी, मिरपूड, लवंगा, ओवा हळदीच्या काढ्याने 24 तासांत कोरोना विषाणू बरा होतो

Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतामध्ये सध्या कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट सुरु आहे. एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे, तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना अवलंबून या विषाणूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने कितीही जनजागृती केली तरी सोशल मिडियावर कोरोना विषाणू व त्यापासून कसे संरक्षण करायचे याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी व्हायरल होत असतात. आताही सोशल मिडियावर एक ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे,  त्यामध्ये दावा केला आहे की वेलची, दालचिनी, मिरपूड, लवंगा, ओवा हळदीच्या काढ्याने 24 तासांत कोरोना विषाणू बरा होतो. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याची माहिती पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) दिली आहे.

सध्या कोरोना विषाणूवर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही. स्वतःची काळजी घेऊनच या विषाणूपासून संरक्षण करता येऊ शकते. इतर काही उपाय व लसीकरण याद्वारे त्यावर काही प्रमाणात विजय मिळवता येऊ शकतो. सरकार याबाबत वेळोवेळी जनजागृती करत आहे, मात्र तरी सोशल मिडीयावर या आजारापासून बरे होण्याचे विविध दावे केले जात आहेत. आता एका व्हायरल ऑडीओ क्लिपमध्ये सांगितले आहे की, ‘जर कोरोना झाला, साधी सर्दी किंवा खोकला झाला, नाकातून पाणी गळत असेल तर वेलची, दालचिनी, मिरपूड, लवंगा, ओवा, हळद यांचा काढा करा व त्याचे सेवन करा. काढा गाळून घेतल्यानंतर भांड्यामध्ये जे काही उरेल त्यात अजून थोडे पाणी टाकून त्याची वाफ घ्या.’

पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने या ऑडिओमध्ये केलेल्या दाव्याची सत्यता पडताळून पाहिली. आता त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की, हा दावा पूर्णतः खोटा असून ही ऑडिओ शेअर करू नका. टीम पुढे म्हणते, ‘अशा प्रकारच्या काढ्यामुळे कोरोना विषाणू बरा होत नाही, तर अशा प्रकारच्या काढ्याचे सेवन क्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी केले जाऊ शकते. कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.’ (हेही वाचा: Fact Check: 3 महिन्यांसाठी Free Internet सुविधा देण्याची भारत सरकारची घोषणा? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

दरम्यान याआधी एका व्हिडीओमध्ये दावा केला होता की, नाकामध्ये लिंबूचा रस घातल्याने कोरोना विषाणू निघून जाऊ शकतो. ही माहितीही पूर्णतः चुकीची असल्याचे केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक टीमने सांगितले होते.

Tags



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif