Fact Check: उत्पादन शुल्क विभागाकडून सर्व राज्यात 70 हजारहून अधिक नियुक्त्यांची घोषणा? PIB ने केला व्हायरल WhatsApp Message चा खुलासा
यात उत्पादन शुल्क विभागाने सर्व राज्यात 70 हजारहून अधिक नियुक्त्यांची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. यात उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) सर्व राज्यात 70 हजारहून अधिक नियुक्त्यांची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. तसंच सरकारला टॅक्सच्या रुपात सर्वाधिक इन्कम मिळतं आणि यातील सर्वाधिक रक्कम उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त होतं. असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने 50% हून अधिक दुकानांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाकडून सर्व राज्यांमध्ये 70 हजार हून अधिक नियुक्त्या करण्याची घोषणा केली आहे.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे प्रेस इन्फोरमेशन ब्युरो (Press Information Bureau) म्हणजे पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) सांगितले आहे. हा दावा फेक असून अशा कोणत्याही प्रकारची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही, असे पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटद्वारे सांगितले आहे. (Fact Check: प्रधानमंत्री कन्या आयुष योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला 2000 रुपये देण्यात येत आहेत? काय आहे यामागील सत्य? जाणून घ्या PIB चा खुलासा)
व्हायरल मेसेजमधील दावा: उत्पादन शुल्क विभागाकडून सर्व राज्यात 70,000 हून अधिक नियुक्त्या करण्यात येणार आहेत व्हॉट्सअॅप वर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
पीआयबी फॅक्ट चेक: हा दावा खोटा आहे. सरकारकडून अशा कोणत्याही प्रकारची नियुक्तीची घोषणा करण्यात आलेली नाही.
Fact Check by PIB:
कोरोना व्हायरस संकट काळात सोशल मीडियाद्वारे अनेक अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे संकट काळात लोकांमधील भीती, चिंता अधिकच वाढत आहे. म्हणूनच अशा दिशाभूल करणाऱ्या फेक मेसेजेपासून सावध राहण्याचे आवाहन सरकार द्वारे वारंवार करण्यात येत आहे. तसंच खऱ्या माहितीसाठी नागरिकांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असेही सांगितले जात आहे.