Rajasthan Shocker: दारूच्या नशेत पतीने पत्नीवर अत्याचार करून तिला मोटरसायकलला बांधून घसतट नेले; राजस्थानच्या नागौरमधून व्हायरल होत आहे लाजिरवाणा व्हिडिओ

येथे एका महिलेला तिच्या मद्यधुंद पतीने मारहाण केली आणि नंतर मोटारसायकलला बांधून गावात ओढून नेले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Photo Credit: X

Rajasthan Shocker: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या मद्यधुंद पतीने मारहाण केली आणि नंतर मोटारसायकलला बांधून गावात ओढून नेले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंचौरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ही कथित घटना नहरसिंहपुरा गावात एक महिन्यापूर्वी घडली होती. प्रेमाराम मेघवाल (३२) असे आरोपीचे नाव आहे, त्याने पत्नीला मारहाण केली आणि नंतर तिला मोटरसायकलला बांधून गावात ओढून नेले. या घटनेबाबत पीडित महिलेने कोणतीही तक्रार दिली नाही. सध्या ती तिच्या नातेवाईकांकडे राहत आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पीडितेचा पती प्रेमराम मेघवाल याला ताब्यात घेतले.हेही वाचा: Delhi Crime: कारमध्ये बसलेल्या महिलेला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Shocking incident in Nagaur: A man, under the influence of alcohol,tied his wife to the back of a bike and dragged her on the road.The video went viral, leading to the man's arrest. Prior to this, the wife was reportedly held captive at home. She is now with her mother in Punjab. pic.twitter.com/Nfik4CJpqj

— Smriti Sharma (@SmritiSharma_) August 13, 2024

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी असेही सांगितले की आरोपी मेघवाल हा मद्यपी होता आणि तो अनेकदा त्याच्या पत्नीला मारहाण करत असे. त्याला गावात कोणाशीही बोलू दिले नाही. आरोपीच्या शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, नागौरचे पोलीस अधीक्षक नारायण तोगस यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.तिला बहिणीकडे जायचे असल्याने महिला आणि पुरुषामध्ये काही वाद झाल्याचे समजते. आम्ही त्याच्याशी संपर्क साधला आहे. ती नागौरला येईल, त्यानंतर पुढील कारवाई करू. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.