डॉ. मनीषा पाटील यांच्या मृत्यूच्या पोस्टवर डॉ. रिचा राजपूत यांचा फोटो; व्हायरल पोस्टवर मजेशीर ट्विट करत डॉ. रिचा यांचा खुलासा (View Tweet)

महाराष्ट्रातील एक महिला डॉक्टरला कोरोनावर उपचार करताना कोविड 19 ची लागण झाली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. असा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

Fake news with picture of Dr Richa Rajpoot (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात अनेक फेक न्यूज व्हायरल होत आहेत. त्यात अजून एका बातमीची भर पडली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील एक महिला डॉक्टरला कोरोनावर उपचार करताना कोविड 19 ची लागण झाली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. असा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोस्टसह महिला डॉक्टरचा फोटो देखील देण्यात आला आहे. तसंच या महिला डॉक्टरचे नाव मनीषा पाटील (Dr. Manisha Patil)असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर डॉ. रिचा राजपूत (Dr.Richa Rajpoot) यांनी खास ट्विट केले आहे.

खरंतर सोशल मीडियावर डॉ. मनीषा पाटील यांच्या नावाने व्हायरल होत असणाऱ्या पोस्टमधील फोटो उत्तर प्रदेशातील डॉ. रिचा राजपूत यांचा आहे. डॉ. रिचा यांनी खुद्द ही पोस्ट फेक असल्याचे सांगितले आहे. यावर रडू की हसू अशी परिस्थिती झालेल्या डॉ. रिचा यांनी खास ट्विटमध्ये म्हटले की, आता माझे भूत माझे ट्विटर अकाऊंट हँडल करेल. माझ्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करा.

व्हायरल होणारी पोस्ट:

डॉ. रिचा राजपूत यांचे ट्विट:

अबसे हमारा भूत ये ट्विटर एकाउंट ऑपरेट करेगा 😠

हमारी आत्मा की शांति के लिए प्रार्थना करे 🙏 pic.twitter.com/4cl1ZqWaL3

सोशल मीडियावर अनेकदा चुकीची, खोटी माहिती अगदी वेगाने पसरते. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर यावरील सर्वच पोस्टवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विशेष म्हणजे अशा पोस्ट शेअर किंवा फॉरवर्ड करु नका. कोरोना व्हायरसच्या ही कठीण लढाईत फेक न्यूजचा अडथळा नको.