DMart Online Questionnaire Contest Fact Check: मोहरम च्या पार्श्वभूमीवर डीमार्ट लकी ड्रॉ मधून गिफ्ट देत असल्याचे खोटे मेसेज वायरल; जाणून घ्या सत्य

दरम्यान शेअर केलेल्या यूआरएल लिंक मध्ये डीमार्टचा उल्लेख नाही.https://qjof.buzz किंवा zfdw.online/emit/404/p अशी लिंक असल्याने सहाजिकच हा बनावट दावा आहे.

सोशल मीडीयामुळे जग जरी जवळ आलं असलं तरीही सायबर क्राईमचेही प्रकार वाढले आहेत. सायबर क्राईम मध्ये लोकांची आर्थिक फसवणूक ते खाजगी माहितीवर डल्ला मारणं अशा अनेक बाबी अगदी बेमालूमपणे केल्या जातात. ओळख लपवून ही चोरी केली जात असल्याने सहाजिकच अनेक भोळेभाबडे लोक यामध्ये अडकतात. सध्या सोशल मीडीयात DMart च्या नावे सध्या सोशल मीडीयामध्ये एक खोटा मेसेज वायरल होत आहे. यामध्ये लकी ड्रॉ च्या माध्यमातून तुम्हांला Muharram gift जिंकता येईल असा दावा केला जात आहे. एका प्रश्नावलीच्या माध्यमातून 65,402 जिंकता येतील असं आमिष दाखवलं जात आहे. कमेंट सेक्शन मध्ये काहींनी गिफ्ट मिळाल्याचा दावा केला आहे मात्र डीमार्ट च्या वेबसाईट किंवा सोशल मीडीया हॅन्डल्स वर त्याची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान शेअर केलेल्या यूआरएल लिंक मध्ये डीमार्टचा उल्लेख नाही.https://qjof.buzz किंवा zfdw.online/emit/404/p अशी लिंक असल्याने सहाजिकच हा बनावट दावा आहे.

खोटा दावा

 

मेसेजमध्ये  quiz template आहे ज्यामध्ये "तुम्हाला DMart माहित आहे का?" आणि योग्य गिफ्ट बॉक्स निवडल्यावर रोख बक्षीस  देतो. हे सहभागींना 5 गट किंवा 20 मित्रांसह जाहिरात शेअरा करण्याची आणि भेटवस्तू मिळवण्यासाठी 5-7 दिवसांच्या आत नोंदणी फॉर्म पूर्ण करण्याची सूचना देते. संदेशाची विश्वासार्हता वाढवून काही युजर्सनी त्यांना भेटवस्तू मिळाल्याची माहिती दिली आहे.

सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांनंतर आता अनोळखी लिंक वर क्लिक करणं युजर्सने टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.  डीमार्ट्च्या नावे फिरणारा मेसेज देखील तशाच स्वरूपाचा आहे. या क्लिक करून तुमची फसवणूक होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा बनावट दाव्यांची खात्री केल्याशिवाय त्यामध्ये सहभागी होणं टाळा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif