Diwali Ki Safai Funny Memes: दिवाळी 2020 अवघ्या 20 दिवसांवर; सोशल मीडियावर सणाच्या पार्श्वभूमीवर साफसफाईला कंटाळणार्यांवर जोक्स, मिम्सचा पाऊस सुरु
ट्वीटर, इंस्टाग्रामवर आता मजेशीर मिम्स, धम्माल विनोद व्हायरल होत आहे.
नवरात्र 2020 (Navratri) संपली आणि आता भारतामध्ये नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहे. दिवाळी (Diwali) म्हणजे जल्लोष, रोषणाई, फराळ, फटाके असले तरीही त्याची सुरूवात दिवाळीच्या साफसफाई पासून होते. अवघ्या 15 दिवसांवर आता दिवाळी येऊन ठेपल्याने घराघरामध्ये आगामी 2 विकेंड्स पुन्हा साफसफाईच्या कामांमध्ये जाणार आहेत. दरम्यान यंदा 13 नोव्हेंबर पासून दिवाळी सुरू होत असल्याने त्याच्या अनुषंगाने अनेकांची आई-बाबांसोबत सुरू होणारी साफसफाईची ड्युटी पाहता, सोशल मीडियात 'दिवाळी सफाई' (Diwali Ki Safai )मिम्स पसरायला सुरूवात झाली आहे. ट्वीटर, इंस्टाग्रामवर आता मजेशीर मिम्स, धम्माल विनोद व्हायरल होत आहे.
दिवाळी हा सणांचा राजा आहे. अनेक संस्कृती आणि धर्मांचं वैविध्य जरी भारतामध्ये असलं तरीही दिवाळीच्या सणात सारेच एकत्र येतात. घराघरामध्ये खरेदीची धामधूम असते. फराळ बनवण्याची घाई असते पण या सणाच्या निमित्ताने वर्षातून एकदा पूर्ण घराची झाडलोट केली जाते. काना-कोपरा स्वच्छ केला जातो. रंगरंगोटी होते. जुन्या वस्तू काढून नव्या वस्तू घेतल्या जातात. त्यामुळे घरातील आबालवृद्ध या निमित्ताने एकत्र काम करता. कामांची विभागणी होते. यंदा कोरोना वायरस लॉकडाऊन कायम असल्याने सारेच घरात असल्याने अनेक घरात आईच्या वरकामांमधून अनेक पळ काढण्यासाठी बाहेरही पडता येणार नाही. हीच भावना मजेशीर अंदाजात मांडत सध्या नेटकर्यांनी मिम्स वायरल करायला सुरूवात केली आहे. पहा त्यामधील काही मजेशीर ट्वीट
घराघरात दिवाळीच्या साफसफाईच्या निमित्ताने असलेली स्थिती अशीच आहे ना? की तुम्ही लॉकडाऊनमुळे नियमित साफसफाईच्या ड्युटीसोबत स्वतःला आता जुळवूनच घेतलं आहे. आम्हांलाही सांगा कशी आहे तुमची यंदाची दिवाळी तयारी!