कोरोनाची लस घेण्यासाठी पोहचला डायनासोर, पहा हसू न आवरणारा Viral Video
कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लसीकरण अभियान सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरु आहे.
Viral Video: जगभरात कोरोना व्हायरसमुळे सर्वजण चिंतेत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लसीकरण अभियान सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरु आहे. पण काही ठिकाणी लसीकरण केंद्रावर लसच उपलब्ध नसल्याचे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर सुद्धा आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन केले जात आहेच. पण तुम्ही एखाद्या डायनासोरला लसीकरण केंद्रावर लस घेताना पाहिले तर तुमची रिअॅक्शन काय असेल? याच संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
Kennysia नावाच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवरुन डायनासोर लस घेण्यासाठी पोहचल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 49,417 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर युजर्सकडून मजेशीर कमेंट्स सु्द्धा करण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ सर्वांच्या पसंदीस पडला आहे.(जमिनीपासून 6 हजार फूट उंचीवरून झोपाळ्यावरुन झोका घेणे महिलांना पडले महागात, पहा थरारक व्हिडिओ मध्ये नक्की काय झाले)
व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एक डायनासोर कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहचला. डायनासोर लसीकरण केंद्रावर आल्याचे पाहून सर्वजण हैराण झाले. जर तुम्ही खरंच डायनासोर लस घ्यायला आल्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण डायनासोरच्या वेशात एक व्यक्ती लस घेण्यासाठी पोहचला होता. जेणेकरुन अधिकाधिक लोकांनी कोरोनाची लस घ्यावी हा त्यामागील मुख्य उद्देष होता.