Lalbaugcha Raja New Viral Video: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान सेलिब्रेटी आणि सामान्य भक्तांना वेगवेगळी वागणूक; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फुटले नव्या वादाला तोंड
येथे बाप्पाच्या दर्शनासाठी रांगाचं-रांगा लागतात. परंतु, अलिकडे सेलिब्रिटींना प्राधान्य देण्याच्या उदयोन्मुख पॅटर्नमुळे सामान्यांवर अन्याय होत आहे. सेलिब्रिटी, राजकारणी आणि व्यावसायिक उच्चभ्रू अनेकदा व्हीआयपी ट्रीटमेंटसह मिळालेल्या दर्शनाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Lalbaugcha Raja New Viral Video: गणेशोत्सव हा हिंदूं धर्मामध्ये साजरा होणारा एक मोठा उत्सव आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की, दरवर्षी, मुंबईचे प्रतिष्ठित लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणपती मंडळ देशभरातील गणेश भक्तांना आकर्षित करते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मुंबईत येतात. मुंबईत सुरक्षित कामाची जागा दिल्याबद्दल लालबागच्या मध्यभागी वसलेल्या, मच्छीमार आणि व्यापाऱ्यांच्या एका गटाने लालबागच्या राजाची स्थापना केली.
श्रीगणेशासाठी सर्व भक्त समान आहेत, परंतु अलीकडे सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ त्याची एक विरोधाभासी बाजू दर्शवतात. दर्शनादरम्यान सेलिब्रिटी आणि सामान्य भक्त यांच्यातील फरक दाखवणाऱ्या व्हायरल व्हिडिओंमुळे सध्या सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या सामान्यांच्या तुलनेत सेलिब्रिटींना विशेष वागणूक दिली जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने गणपती बाप्पाचे आशीर्वाद केवळ VIP लोकांसाठीच आहेत का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. (हेही वाचा - Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या मंडपात Simran Budhrup हिच्यासोबत धक्काबुक्की, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ)
अनेक वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान लालबागचा राजा हे मुंबईतील एक प्रमुख आकर्षण ठिकाण आहे. येथे बाप्पाच्या दर्शनासाठी रांगाचं-रांगा लागतात. परंतु, अलिकडे सेलिब्रिटींना प्राधान्य देण्याच्या उदयोन्मुख पॅटर्नमुळे सामान्यांवर अन्याय होत आहे. सेलिब्रिटी, राजकारणी आणि व्यावसायिक उच्चभ्रू अनेकदा व्हीआयपी ट्रीटमेंटसह मिळालेल्या दर्शनाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, सामान्य भक्ता तासनतास रांगेमध्ये उभे राहूनही दर्शनावेळी त्यांना लोटलं जातं आहे. परंतु, व्हीआयपी रांगेतील लोक दर्शनासाठी गेल्यानंतर तिथेचं फोटो काढताना आणि रील्स बनवताना दिसत आहेत.
गणपती दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांची गर्दी -
सर्वसामान्य आणि व्हिआयपी, सेलिब्रिटींना दर्शनामध्ये भेदभावपूर्वक वागणूक -
गणपती बाप्पा फक्त व्हीआयपींसाठी का?
सध्या सोशल मीडियावर भेदभाव दर्शवणाऱ्या या दोन प्रकारच्या व्हिडिओमुळे नेटीझन्स संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. यातील काही व्हिडिओंमध्ये असेही दिसत आहे की, ‘आम’ भक्तांना, गणपतीच्या एका पायाला स्पर्श केल्यानंतर त्यांना पंडालबाहेर ढकलले जाते. सध्या सोशल मीडियावर या भेदभावाविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. या वागणुकीवर बंदी घालावी आणि सर्वांना समान वागणूक दिली जावी, अशी मागणी सध्यो सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.