Dhinchak Pooja New Song: ढिंचाक पूजाचे नवीन गाणे Dilo Ka Shooter 2.0 चाहत्यांच्या भेटीला; सोशल मिडियावर पुन्हा एकदा झाली ट्रोल (Watch Video)
यावेळी तिने आपल्या चाहत्यांसाठी ‘दिलों का शूटर… 2.0' (Dilo Ka Shooter 2.0) गाण्याची नवीन आवृत्ती सादर केली आहे.
सध्याच्या काळात सोशल मिडियामुळे कोण-कधी-कसे व्हायरल होईल सांगता येत नाही. दोन वर्षांपूर्वी देशात ढिंच्याक पूजा (Dhinchak Pooja) नावाच्या गायिकेची लाट आली होती. ‘सेल्फी मैने लेली यार’ या गाण्यामुळे ही तरुणी रातोरात स्टार झाली होती. ही मुलगी उत्तम गाते म्हणून तिला लोकप्रियता मिळाली नव्हती, तर ती वाईट गाते म्हणून ती लोकप्रिय ठरली होती. आता ढिंचाक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने आपल्या चाहत्यांसाठी ‘दिलों का शूटर… 2.0' (Dilo Ka Shooter 2.0) गाण्याची नवीन आवृत्ती सादर केली आहे.
स्वतःला गायिका म्हणवणाऱ्या या तरुणीने आपल्या अतिशय टुकार गाण्यांच्या जोरावर चक्क बिग बॉसपर्यंत मजल मारली होती. पुजाला आपल्या गाण्यांमुळे अनेक लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा तिच्या ‘दिलों का शूटर… 2.0' गाण्याची खिल्ली उडवली जात आहे. आपल्या या नव्या गाण्यामध्ये पूजाचा अवतार थोडा बदललेला दिसत आहे. या गाण्यामध्ये तिने संगीतावरही काम केल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: ढिंच्याक पूजा हीच्या चाहत्यांना नवी ट्रिट; 'नाचे जब कुडी दिल्ली दी' गाणे प्रदर्शित)
ढिंचाक पूजाने ‘दिलों का शूटर… 2.0' हे गाणे 15 ऑक्टोबर रोजी तिच्या यूट्यूब अकाऊंटवर रिलीज केले, जे आतापर्यंत 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. मात्र, तिने यावरील आपला कमेंट सेक्शन बंद केला आहे. पण जेव्हा पूजाने मंगळवारी तिच्या फेसबुक अकाऊंटवर त्याची लिंक शेअर केली, तेव्हा लोकांनी तिथे तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कलाकाराने काय करावे यापेक्षा काय करू नये याचे हे गाणे एक उत्तम उदाहरण आहे. पूजाच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणेदेखील फार विनोदी ढंगात चित्रित झाले आहे.