Desi Jugaad Video: कोविड-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी बाईकस्वाराने लढवली अनोखी शक्कल; व्हिडिओ व्हायरल

यावर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहेत. नागरिकही सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत. तर ग्रामीण भागात कोविड-19 पासून वाचण्यासाठी लोक नवनवी शक्कल लढवत आहेत.

Desi Jugaad Video (Photo Credits: Twitter)

संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) सामना करत आहे. यावर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहेत. नागरिकही सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत. तर ग्रामीण भागात कोविड-19 (Covid-19) पासून वाचण्यासाठी लोक नवनव्या शक्कल लढवत आहेत. असाच एक देसी जुगाड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकाल, एका व्यक्तीने आपल्या बाईला 'बबल सर्व्हिस' मध्ये बदलले आहे. तसंच मागे बसणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी खास बैठक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती त्याच्या 'बबल बाईक' वर चालवताना दिसत आहे. त्या व्यक्तीने दुचाकीवर बांबूच्या खांबाच्या साहाय्याने चारी बाजूने प्लॉस्टिक लावले आहे. तर मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी खुर्चीची सोय केली आहे. हा देसी जुगाड नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया देखील पाहायला मिळत आहेत. (Desi Jugaad Video: वाफ घेण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल, प्रेशर कुकरला बनवले स्टिमर)

पहा व्हिडिओ:

'आत्मनिर्भर भारत', 'स्वदेसी वापरा', असं म्हणत नेटकरी व्हिडिओवर कमेंट करत आहेत. यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक देसी जुगाड कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांनी केले आहेत. त्याचे देखील व्हिडिओ समोर आले असून नेटकऱ्यांनी त्यावरही कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.