दिल्ली: Zomato ने नॉन हिंदू डिलेव्हरी बॉय पाठवल्याने ग्राहकाने रद्द केली ऑर्डर; 'झोमॅटो' च्या प्रत्युत्तराने जिंकलं नेटकर्यांचं मन
मात्र ही विनंती आणि ऑर्डर नाकारत झोमॅटोने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली शहरामध्ये Zomato वर नॉन हिंदू डिलेव्हरी बॉयकडून फूड डिलेव्हरी आल्याने एका ग्राहकाने आपली ऑर्डर रद्द केली. मात्र त्यावर झोमॅटोने दिलेल्या रिप्लायचं नेटिझन्सने कौतुक केलं आहे. अमित शुक्ल असं ग्राहकाचं नाव असून त्याने ऑर्डर दिल्यानंतर डिलेव्हरी बॉय हिंदू नसल्याच समजताच दुसर्या डिलेव्हरीकडून जेवण पाठवण्यची मागणी केली होती. मात्र त्या झोमॅटो ची ही विनंती नाकरत ऑर्डर रद्द करत झोमॅटोने 'Food doesn’t have a religion. It is a religion' असं प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
अमित शुक्ल या ग्राहकाने झॉमेटोवरून काही पदार्थांची ऑर्डर दिली होती. जेव्हा त्याला समजलं की त्याची ऑर्डर नॉन हिंदू डिलेव्हरी बॉयकडे होती. त्यावेळेस त्याने झोमॅटोला रायडर बदलून देण्यास सांगितलं. मात्र त्याला नकार देण्यात आला. तसेच रिफंड देण्यासही नकार दिला. ट्विटरवर या प्रकाराविषयीचं ट्विट अमित शुक्ल या तरूणाने केलं आहे. त्याने या ट्विटमध्ये 'तुम्ही मला फूड डिलेव्हरी घेण्यासाठी दबाव टाकू शकत नाही तसेच मला तुमचा रिफंडही नको माझी ऑर्डर रद्द करा असे सांगितले आहे.
झोमॅटोनेदेखील या प्रकारानंतर अन्नाला कोणताही धर्म नसतो असं म्हणत ऑर्डर रद्द करून अमित शुक्ल या व्यक्तीला ब्लॉक केलं आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
अमित शुक्ल यांनी याप्रकारानंतर कायदेशीर लढाई लढणार असल्याचं म्हटलं आहे.