Sexist Comments By Delhi Women: मुलींनी शॉर्ट कपडे घातले म्हणून सात तरुणांनी करावा बलात्कार, दिल्लीतील महिलेचे वादग्रस्त विधान (watch video)
या महिलेला धारेवर धरत सोशल मीडीयावरून विरोध दर्शवला जात आहे.
दिल्ली: स्त्री सुरक्षेच्या (Women safety) प्रश्नांवर जगभरात वाद सुरु असताना अनेकदा महिलाच महिलांच्या शत्रू बनतात असं मत ऐकू येतं. या विधानाची सार्थता पटवून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे.या मध्ये दिल्लीतील (Delhi Aunty) एक महिला एका हॉटेल मधील तरुणीच्या कपड्यानां संबोधून वादग्रस्त विधानं करताना पाहायला मिळत आहे. या महिलेची संकुचित बुद्धिमत्ता व मूर्खतेने भरलेली विधाने असलेला व्हिडिओ शिवानी गुप्ता (Shivani Gupta) या तरुणीने सोशल मीडियावर शेअर केला.
या मध्यम वयाच्या महिलेने, हॉटेल मध्ये आलेल्या एका तरुण मुलींच्या ग्रुपला त्यांनी घातलेल्या शॉर्ट कपड्यांमुळे त्यांचा बलात्कार झाला पाहिजे असे म्हंटले होते. आपलं हे लैंगिक भेदभावाला खतपाणी देणारं वाक्य कमी होतं की काय ही महिला हॉटेल मधील सात तरुणांना, या मुलींची कपडे अनुचित आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचा बलात्कार करू शकता असंही सांगताना पाहायला मिळतंय. ही वाक्य ऐकल्यावर शिवानी आणि तिच्या मैत्रणींच्या ग्रुप ने या महिलेचा व्हिडीओ काढायला सुरवात केली, हे समजल्यावर ही महिला अधिकच उद्धटपणे त्यांना उत्तर द्यायला लागली. "या मुली मुद्दाम इतके तोकडे कपडे घालतात ज्यामुळे सगळ्यांच लक्ष वेधलं जाईल. अशा मुली बलात्कार करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देतात" असंही वक्तव्य या महिलेने केलं होतं.
व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओ सोबत शिवानीने लिहिलेल्या कॅप्शन मध्ये या घट्नेची माहिती दिली आहे, हा प्रकार घडल्यावर ही महिला तिथून निघून खरेदीसाठी एका दुकानात गेली, तिच्या पाठोपाठ तिथे जात या मुलींच्या ग्रुपने आणि हा प्रकार समजल्यावर आजूबाजूच्या अनेक महिलांनी या विधानासाठी माफी मागायला संगितली मात्र यामुळे तसूभर देखील फरक पडून न घेता उलट मीच पोलिसांना बोलावेन अशी धमकी या महिलेने दिली. मानखुर्द परिसरात सामुहिक बलात्काराचा प्रयत्न, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात
हा व्हिडीओ आतापर्यंत 347,519 लोकांपर्यंत पोहचला असून अनेकांनी या घटनेचा विरोध केला आहे. याचसोबत या महिलेच्या सोशल मीडियावरील कमी कपाड्यांचा फोटो देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्वतः तोकडे कपडे घालून इतर मुलींना चुकीचे उपदेश देणाऱ्या या महिलेला नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.
सोशल मीडियावर विरोध
कमी कपडे आणि बलात्कार यांचा संबंध जोडणारी विधाने काही नवीन नसली तरी एका महिलेनेच एका मुलीच्या विरोधात असं म्हणत तिच्या दृष्टीने अनुचित असणारे कपडे घातल्याची शिक्षा म्हणून हॉटेल मधील तरुणांना बलात्कार करण्याचं आवाहन करणे हे लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दर्शवली जातेय.