Bull Fight On Railway Track: खतरनाक! थेट रेल्वे रुळाजवळ बैलांची झुंज, लोको पायलटने थांबवली ट्रेन

त्यात आणखी एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन बैलांची झुंज थेट रेल्वे रुळावर होत आहे

Bull Fight On Railway Track : PC TW

Bull Fight On Railway Track: सोशल मीडियावर बैलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले नेटकऱ्यांनी पाहिले आहे. त्यात आणखी एक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे. दोन बैलांची झुंज थेट रेल्वे रुळावर होत आहे. रेल्वे रुळाजवळ उभे असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लोको पायलटने सावधगिरी बाळगून वेळीच ट्रेन थांबवली(हेही वाचा- दिवेघाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता कात्रज घाटात दिसला बिबट्या (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ @Ananth_IRAS नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रेल्वे रुळाच्या अगदी बाजूलाच दोन बैलांची झुंज सुरु होती. बैलांची झुंज सुरु असताना कोणीही त्यांच्या भांडणात जाण्याची हिंमत करत नाही. मात्र रेल्वे गेटजवळ भांडण सुरु असताना लोको पायलटने बऱ्याचदा हॉर्न वाजवून बैलाना हकलवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघे ही तिथेच आपआपसांत भिडण्यात व्यस्त होते. दोन बैल आपआपसांत भिडल्याचे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना.

पाहा व्हिडिओ

रेल्वे रूळ ओलांडणांसाठी बरचे स्थानिक उभे होते. बैलांची झुंज चालू झाल्यावर स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एकाने बैलांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सद्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले. हा व्हिडिओ कुठला आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वे रुळावर बैलांची झुंज पाहताच रेल्वे लोको पायलटने ट्रेन थांबवली. ट्रेन थांबवल्यामुळे दोघांचा जीव वाचला आहे.