COVID 19: 'आपण Corona ला पचवू शकतो,तो आपल्याला नाही' असे म्हणत पश्चिम बंगाल मध्ये साकारण्यात आली कोरोना च्या रूपातील मिठाई (See Photos)
या मार्गे लोकांना धरी देत आपण कोरोनाला पचवू शकतो आणि तो आपल्याला नाही अशी आशा सर्वांमध्ये निर्माण करायची आहे असे मत या दुकानाच्या मालकांनी व्यक्त केले.
भारतात कोरोनाने (Coronavirus) आपला फैलाव वेगाने करतच साऱ्यांना चिंतेत टाकले असले तरी याही परिस्थितीत भारतीयांच्या क्रिएटिव्हिटीला मात्र कोरोनाचे संकट सुद्धा रोखू शकलेले नाही. कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी म्हणा किंवा त्याला लढा देण्यासाठी, अनेक भारतीय मंडळी एकाहून एक भन्नाट मार्ग शोधून काढत आहेत. असाच प्रकार आता पश्चिम बंगाल (West Bengal) मधील कोलकाता (Kolkata) या शहरात दिसून आला आहे. कोलकाता येथील एका मिठाईच्या दुकानात कोरोनाचे निमित्त साधून खास कोरोना विषाणूच्या रूपासारखी मिठाई बनवण्यात आली आहे. माध्यमात प्रसारित होणाऱ्या लाल रंगाच्या कोरोना विषाणूच्या रूपात ही मिठाई बनवण्यात आली आहे या मार्गे लोकांना धरी देत आपण कोरोनाला पचवू शकतो आणि तो आपल्याला नाही अशी आशा सर्वांमध्ये निर्माण करायची आहे असे मत या दुकानाच्या मालकांनी व्यक्त केले. Lockdown काळात लोकांना घरी राहण्यासाठी स्वतः Coronavirus, यमराज आणि चित्रगुप्त करतायत आवाहन; जाणून घ्या आंध्रप्रदेश पोलिसांची हटके Trick
कोलकाता मधील या मिठाईच्या दुकानाच्या मालकांनी या मिठीच्या खास रूपाबाबत सांगताना म्हंटले की, "आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात लाखो मृत्यू झाले आहेत. अशावेळी साहजिकच लोकांमध्ये भीती असणार, ही भीती दूर करण्यासाठी आणि लोकांना आधार देण्यासाठी ही मिठाई साकारण्यात आली आहे. यामार्फत आपण कोरोनाला पचवू शकतो, तो आपल्याला नाही हा संदेश लोकांपर्यंत पोहचवायचा आहे." ANI या वृत्तसंस्थेच्या मार्फत याचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
ANI ट्विट
दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या रूपातील हेल्मेट वापरून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, तर छत्तीसगढ भागात अलीकडेच एका दांपत्याने आपल्या जुळ्या मुलांचे नाव कोव्हीड आणि कोरोना असे ठेवले होते. या सर्व प्रसंगातून भारतीय आणि त्यांची क्रिएटिव्हिटी ही अफाट असल्याचे दिसून येते.