Couple Indecent Stunt On Bandra Reclamation: बाइकवर रोमान्स! मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनवर जोडप्याचा अश्लील स्टंट; गुन्हा दाखल, Watch Video

नेटीझन्सनी कमेन्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केले असून विचित्र स्कूटर राईडसाठी दोघांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Couple's Indecent Stunt On Bandra Reclamation (फोटो सौजन्य - X/@bandrabuzz)

Couple Indecent Stunt On Bandra Reclamation: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपे मुंबई (Mumbai) च्या व्यस्त रस्त्यावर स्कूटर चालवताना दिसत आहे. मुंबईच्या वांद्रे रेक्लेमेशन रोडवर (Bandra Reclamation) चालत्या वाहनावर या जोडप्याने सार्वजनिकपणे रोमान्स केला. हे दोघे हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना दिसले. व्हिडिओमध्ये हे जोडपे मुंबईच्या रस्त्यावर स्कूटर चालवत असताना एकमेकांना घट्ट मिठीत मारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ही महिला तिच्या जोडीदाराच्या मांडीवर उलट्या स्थितीत बसलेली आणि स्वत:ला व तिच्या जोडीदाराला शॉलने झाकताना दिसत आहे.

हा व्हिडिओ त्यांच्या सोबतच्या सहप्रवाशाने शूट केला आहे. यात हे जोडपे एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. याशिवाय, ते हायवेवर हेल्मेटशिवाय स्कूटर चालवताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा -Atal Setu मुंबईकरांसाठी खुला! पहिल्याच दिवशी केलेल्या गर्दीचे, पान खाऊन थुंकल्याचे फोटोज व्हिडिओज वायरल! (Watch Video, Pics))

तथापी, हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे. नेटीझन्सनी कमेन्टमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केले असून विचित्र स्कूटर राईडसाठी दोघांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. एक वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'त्याच्या बाईकचा नंबर नोंदवा आणि पोलिसांकडे तक्रार करा.' दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, ट्राफिक पोलिस कारवाई का करत नाहीत? रस्त्यावर अनेक कॅमेरे बसवले आहेत. याव्यतिरिक्त, एका वापरकर्त्याने म्हटले की, ट्राफिक नियम तोडणाऱ्यांच्या तक्रारींचा विचार करणारे कोणतेही अॅप असेल तर मला कळवा. (हेही वाचा - Vulgar Dance At CSMT Railway Platform: रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या सीमा कन्नौजियाला मुंबई RPF ने शिकवला धडा; व्हिडिओ शेअर करून मागितली माफी मागितली, Watch Video)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

बाइकवर रोमान्स आणि शूटिंगचा ट्रेंड -

अलीकडे, गर्दीच्या रस्त्यावर चालत्या बाइकवर रोमान्स करणाऱ्या जोडप्यांचे व्हिडिओ ट्रेंड होत आहेत. अलीकडेच राजस्थानच्या अजमेरमध्ये एक जोडपे बाईक चालवत असताना चुंबन घेताना दिसले होते. सध्या तरुणांमध्ये हा ट्रेंड वाढताना दिसत आहे. मात्र, अशा प्रकारचे स्टंट धोकादायक ठरू शकता. पोलिस अशा प्रकारचे स्टंट करणाऱ्या जोडप्यांवर कठोर कारवाई करत आहेत.