Coronavirus Vaccine Viral Video: 'कोरोना लस नको' म्हणत तो चढला झाडावर; अधिकाऱ्याने सांगितला मजेशीर किस्सा; व्हिडिओ व्हायरल

यात कोरोना लस टाळण्यासाठी चक्क एक व्यक्ती झाडावर चढून बसला. अखेर प्रशासनाने त्याच्या मनातील भीती दूर झाल्यानंतर तो खाली उतरला आणि लस घ्यायला तयार झाला. या घटनेचा व्हिडिओ (Coronavirus Vaccine Viral Video) सोशल मीडियावर Social Media) व्हायरल झाल आहे.

Coronavirus Vaccine Viral Video | (Photo Credit: Credit - ANI/Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी नियंत्रणासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. दरम्यान, अद्यापही काही नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज आहेत. अशा वेळी प्रशासन आणि आरोग्य विभाग नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहयाला मिळते. बिहार (Bihar) राज्यातील बालिया (Ballia) येथेही अशीच एक घटना घडली. यात कोरोना लस टाळण्यासाठी चक्क एक व्यक्ती झाडावर चढून बसला. अखेर प्रशासनाने त्याच्या मनातील भीती दूर झाल्यानंतर तो खाली उतरला आणि लस घ्यायला तयार झाला. या घटनेचा व्हिडिओ (Coronavirus Vaccine Viral Video) सोशल मीडियावर Social Media) व्हायरल झाल आहे.

एएनआय या वृत्तवाहिनीने याबाबत एक व्हडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यात रेओती येथील ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी अतुल दुबे यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आम्ही जेव्हा लसीकरणासाठी एका ठिकाणी पोहोचलो तेव्हा एक व्यक्ती चक्क झाडावरच चढून बसला. आम्ही त्याला कारण विचारले असता 'आपल्याला लस घ्यायचीच नाही' असे तो म्हणत होता. अखेर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला फायदे तोटे समजून सांगितले. त्याची समजूत काढली मग तो झाडावरुन खाली उतरला. मग तो लसीकरणासही तयार झाल्याचे, अतुल दुबे सांगतात. दरम्यान, घडल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Coronavirus Vaccine Viral Video: कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची धरपकड, व्हिडिओ पाहून येईल हसू)

व्हिडिओ

सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही अधिकारी एका नागरिकाला कोरोना लसीकरणासाठी पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. हा व्हिडिओ (Trending Video) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील असल्याचा दावा केला जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

ट्विट

कोरोना (Corona) काळ हा सर्वांसाठीच एक वाईट कालावधी ठरला. या काळात अवघी दुनिया लॉकडाऊनमध्ये अडकली. सामाजिक डिस्टन्स (Social Distance) ठेवता ठेवता समाजात मोठे अंतरही पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यानच्या काळात लसीकरण सुरु झाले आणि आता कुठे कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. मात्र त्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विषयातील जाणकार सांगतात.