Coronavirus Tips Google Doodle: कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी 'घरी रहा सुरक्षित रहा' आवाहन करणारं खास गूगल डूडल

जगातील आघाडीचं सर्च इंजिन गूगलने देखील आज Coronavirus Tips Google Doodle च्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना घरामध्येच राहण्याचं आवाहन केलं आहे. Stay Home Save Lives Help Stop Coronavirus या थीम खाली जीवघेण्या कोरोना व्हायरस या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सार्‍यांनीच एकत्र येण्याची गरज असल्याचं सांग़ितलं जात आहे.

Coronavirus Tips । Photo Credits: Google.com

Coronavirus Pandemic सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. झपाट्याने जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसचे संक्रमण जगात 10 लाखापेक्षा अधिक लोकांना झाले आहे. आणि दिवसागणिक त्यामुळे मृत्यू होणार्‍यांचे प्रमाणही भयावह आहे. अद्याप या आजारावर कोणतेच ठोस औषध नसल्याने आरोग्य प्रशासनाकडून सोशल डिस्टंन्सिंग आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जगातील आघाडीचं सर्च इंजिन गूगलने देखील आज Coronavirus Tips Google Doodle च्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना घरामध्येच राहण्याचं आवाहन केलं आहे. Stay Home Save Lives Help Stop Coronavirus या थीम खाली जीवघेण्या कोरोना व्हायरस या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सार्‍यांनीच एकत्र येण्याची गरज असल्याचं सांग़ितलं जात आहे. मागील काही दिवसांपासून गूगलच्या होमपेजवर 'DO THE FIVE' ही खास नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली होती. यामध्ये लोकांना घरी रहा, सुरक्षित अंतर पाळा, वारंवार हात धुवा, खोकताना तोंड झाका, आजारी असाल तर वैद्यकीय मदत घ्या असं आवाहन करण्यात आलं होतं. Coronavirus Pandemic: Covid 19 वर मात केल्यानंतर पुन्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो का?

चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसची उत्पत्ती त्यामुळे या भागात मृत्यूतांडव केल्यानंतर कोरोना व्हायरस इटली, स्पेन या युरोपीयन देशांमध्ये तर आता अमेरिकेमध्ये थैमान घालत आहे. दिवसागणिक हजारो लोकं कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमावत आहेत. सध्या अमेरिकेमध्ये सर्वाधिक म्हणजे 245,066 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी मृत्युमुखी पडणार्‍यांचा आकडा सहा हजारांच्या पार गेला आहे. येत्या काही दिवसांत एक ते अडीच लाख अमेरिकन नागरिक आपला जीव गमावतील असा अंदाज आहे.

भारतामध्येही कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 2069 आहे. तर त्यापैकी सध्या 1860 लोकांवर उपचार सुरू असून 53 जणांचा मृत्यू झाला असून 151 लोकांनी कोरोनावर मात देखील केली आहे. कोरोनाचा संसर्ग शिंकताना, खोकताना उडणार्‍या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतो. निरोगी व्यक्तीचा अशा संक्रमित हवेशी, वस्तूशी संपर्क आला तर त्याच्याद्वारा कोरोना व्हायरस शरीरात पसरतो. त्यामुळे शक्यतो लोकांनी एकमेकांसमोर कमी यावं, सोशल डिस्ट्न्सिंग पाळावं, वारंवार किमान 20 सेकंद हात स्वच्छ धुवावेत असे वरंवार सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यासाठी किमान दीड वर्षांचा काळ लागू शकतो त्यामुळे आता बचावातमक उपचारांच्या मदतीनेच कोरोनाचा सामना करणं आपल्याला भाग आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now