Coronavirus TikTok : कोरोना व्हायरस वर टिकटॉक बनवण्यासाठी या स्टार ने चाटले विमानातील टॉयलेट सीट (Watch Video)
या व्हिडीओमध्ये एक प्रसिद्ध टिकटॉक स्टार विमानातील टॉयलेट चाटताना दिसत आहे.
मागील काही काळात जगभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दहशतीने स्वच्छतेला प्रत्येकजण प्राधान्य देताना दिसत आहे. लोकांपर्यंत हेच महत्व पोहचावे याकरिता हँडवॉश चॅलेंज (Handwash Challenge) सारख्या मार्गातून प्रसिद्ध सोशल मीडिया साईट्सवर व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत. यामध्ये टिकटॉक (Tiktok) या माध्यमाचा सुद्धा पुरेपूर वापर केला जातोय अनेक सेलिब्रिटी मंडळींनी टिकटॉकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना स्वच्छ आणि निगा बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र या सर्वांच्या मध्येच एक अगदी विचित्र व्हिडीओ टिकटॉक चॅलेन्जच्या नावाखाली नुकताच समोर आला आहे. एक विदेशी टिकटॉक स्टार विमानातील स्वच्छतेचे पुरावे देण्यासाठी चक्क या व्हिडीओ मध्ये टॉयलेट सीट चाटताना दिसून येत आहे. इंग्लंड: बायकोसोबत खोट बोलून प्रेयसीसोबत फिरायला जाणे पडले महागात, नवऱ्याला झाला कोरोना व्हायरस
या मुलीच्या अकाऊंटवरून मिळालेल्या माहितीनुसार ही अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामीमध्ये राहणारी टिक-टॉक स्टार आहे. तिचे नाव Ava Louise असे असून ती 21 वर्षीय आहे. तिने सोशल मीडियावर ‘कोरोना व्हायरस चॅलेंज’ असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानातील टॉयलेट चाटताना दिसत आहे. या व्हिडिओला तुम्ही खूप शेअर करा जेणेकरून स्वच्छता कशी करावी हे सर्वांना समजेल असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ
दरम्यान, कोरोना सारख्या मोठ्या संकटावर अशा प्रकारचे व्हिडीओ बनवणे हे अत्यंत चुकीचे आहे तू यासाठी माफी माग असे म्हणत नेटकाऱ्यानी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. काहींनी तर तिला वेड्यात काढून कृपया कोणी असे प्रकार करू नका असे आवाहन केले आहे.