Lockdown: बायकोला भेटण्यासाठी मारली सायकलवर टांग; उत्तर प्रदेश ते बिहार 600 किलोमीटरचा प्रवास, भलेभलेही अवाक
तो मुळचा बिहार (Bihar) रहाज्यातील खगडिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने उत्तर प्रदेशातील अमेठी (Amethi) येथून खगडिया असा प्रवास केला.
लॉकडाऊन (Lockdown) असल्याने देशभरातील नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. अवघा देशच ठप्प झाल्याचे चित्र आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अत्यावश्यक कारणाशिवय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई होत आहे. काहींना पोलिसांच्या काठीचा प्रसादही खावा लागत आहे. असे असताना आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी एका व्यक्तीने चक्क सायकलवरुन 600 किलोमीटरचा प्रवास केला आहे. पवन कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मुळचा बिहार (Bihar) रहाज्यातील खगडिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने उत्तर प्रदेशातील अमेठी (Amethi) येथून खगडिया असा प्रवास सुरु केला.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, पवन कुमार नामक व्यक्ती हा मूळचा बिहार राज्यात असलेल्या खगडिया जिल्ह्यातील पिपरालतीफ तालुक्यातील अटैया गावचा रहिवासी आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अमेठी जिल्ह्यातील बहादुरपूर येथील एका तांदळाच्या गिरणीत तो काम करतो. लॉकडाऊन असलममुळे गिरण बंद आहे. त्यातच पवन कुमार यांची पत्नी कोमल यांची प्रकृती बरी नाही. शनिवारी सांयकाळी पवन कुमार यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना कळले की, कोमल यांची प्रकृती ठिक नाही. (हेही वाचा, Lockdown: 65 वर्षीय व्यक्तिचा सायकलवरुन 130 किलोमीटर प्रवास; कर्करोगग्रस्त पत्नीच्या Chemotherapy उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, तामिळनाडू राज्यातील घटना)
कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती ऐकून पवन कुमार यांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. परंतू, त्यांना कोणतेच वाहन मिळाले नाही. अखेर पवन कुमार यांनी सायकल घेऊन आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी (12 एप्रिल 2020) पहाटे चार वाजता पवन यांनी बहादुरपूर सोडले. तब्बल 600 किलोमीटरचा प्रवास करुन ते सोमवारी सायंकाळी चंदौली, पंडित दीनदयाल नगर येथे पोहोचले. आतापर्यंत त्यांनी केवळ 200 किलोमटीर इतकेच अंतर पार केले आहे. सोबत आणलेली चणा आणि लाई खाऊन अजून त्यांना पुढचे 400 किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे.