व्हिडिओ: राहुल गांधी यांनी स्वत: पुसले अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्याचे रक्त
स्कूटरवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडीने पाठीमागून धडक दिली. स्कुटरवरुन जाणारा व्यक्ती रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला. जखमी व्यक्तीला पाहून राहुल गांधी यांनी आपल्या चालकाला गाडी थांबविण्याचा आदेश दिला. जखमी व्यक्तीला त्यांनी सोबत घेतले आणि स्वत:च्या रुमालाने त्यांनी त्या व्यक्तिच्या कपाळावरची जखम साफ केली.
Rahul Gandhi Helped Journalist: काँग्रेस अध्यक्ष (Congress President) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी एका व्यक्तिसोबत वाहनातून प्रवास करत आहेत. तसेच, हा व्यक्ती जखमी अवस्थेत आहे. त्या व्यक्तिच्या डोक्यातून रक्त वाहात आहे. राहुल गांधी हे स्वत: त्या व्यक्तीज्या जखमेतून येणारे रक्त पुसत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते आहे. ही जखमी व्यक्ती पत्रकार असून, राजेंद्र व्यास असे या पत्रकाराचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.
लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, केवळ माहिती इतक्याच उद्देशाने हा व्हिडिओ आम्ही येथे देत आहोत. मिशन शक्ति Vikas Bhadauria ABP नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत राजेंद्र व्यास राहुल यांना बोलताना दिसत आहेत. मी हा व्हिडिओ माझ्या इतर पत्रकार मित्रांना पाठवणार आहे, असे व्यास राहुल यांना सांगत आहेत. व्यास यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी स्मितहास्य करताना दिसतात. (हेही वाचा, सरकारकडून शहीद जवानाच्या कुटुंबाची क्रूर चेष्टा; मदत म्हणून दिला खात्यात पैसे नसलेला चेक)
मिशन शक्ति Vikas Bhadauria ABP ट्विट
प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ दिल्ली येथील हुमायूँ रोडवरील आहे. स्कूटरवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडीने पाठीमागून धडक दिली. स्कुटरवरुन जाणारा व्यक्ती रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला. जखमी व्यक्तीला पाहून राहुल गांधी यांनी आपल्या चालकाला गाडी थांबविण्याचा आदेश दिला. तसेच, जखमी व्यक्तीला त्यांनी सोबत घेतले आणि स्वत:च्या रुमालाने त्यांनी त्या व्यक्तिच्या कपाळावरची जखम साफ केली. हा व्यक्ती पत्रकार राजेंद्र व्यास असल्याचे सांगितले जात आहे.