Shanti Dhariwal Abuses In Rajasthan Assembly: 'तुम कोटा के हो भे*****..'; राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार शांती धारीवाल यांची जीभ घसरली (Watch Video)
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्पीकर धारिवाल यांना बोलण्यासाठी त्यांची निर्धारित वेळ मर्यादा ओलांडली असल्याचं सांगतात आणि त्यांना समाप्त करण्यास सांगतात. यावर धारिवाल आणखी पाच मिनिटे असं म्हणत बोलतात की, 'तुम्ही कोटा येथील आहात भे*****...तुम्हाला कोटा (आरक्षण) पाहिजे की नाही?'
Shanti Dhariwal Abuses In Rajasthan Assembly: राजस्थान विधानसभे (Rajasthan Assembly) च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान कोटाचे आमदार शांती कुमार धारिवाल (Shanti Dhariwal) यांनी स्पीकरशी बोलताना असंसदीय शब्दाचा वापर केला. X वर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धारीवाल स्पीकरसोबत हलकीशी बाचाबाची करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्पीकर धारिवाल यांना बोलण्यासाठी त्यांची निर्धारित वेळ मर्यादा ओलांडली असल्याचं सांगतात आणि त्यांना समाप्त करण्यास सांगतात. यावर धारिवाल आणखी पाच मिनिटे असं म्हणत बोलतात की, 'तुम्ही कोटा येथील आहात भे*****...तुम्हाला कोटा (आरक्षण) पाहिजे की नाही?' यावर सभागृहातील सदस्य हसताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना धारिवाल यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपवर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला. धारीवाल म्हणाले की, सरकारने ग्रेट इंडियन बस्टर्ड संवर्धन प्रकल्पासाठी बोगदा बांधण्याची योजना जाहीर केली होती. परंतु त्याच प्रकल्पाचा डीपीआर अद्याप तयार झाला नसल्याचा त्यांनी यावेळी म्हटलं. त्यावर त्यांना संजय शर्मा यांचे उत्तर मिळाले, ज्यामध्ये लवकरच काम सुरू होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, अशा विषयावर बोलल्याबद्दल सभापती देवनानी यांनी धारिवाल यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, त्यांचे वय 81 वर्षे असले तरी ते अजूनही 19 वर्षांचे आहेत. (हेही वाचा -Kirit Somaiya वर टीका करणात Sanjay Raut यांची जीभ घसरली; म्हणाले, 2024 नंतर सोमय्यासारखे चु... लोक देशात राहणार नाहीत)
पहा व्हिडिओ -
सध्या सोशल मीडियावर शांती कुमार धारिवाल यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात हनुमानगडमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. भद्रचे आमदार संजीव बेनिवाल म्हणाले की, अवैध व्यसनमुक्ती केंद्रे मंजुरीविना सुरू आहेत. व्यसनमुक्त होण्याऐवजी लोकांची पिळवणूक होत आहे.