Condom Addiction: पश्चिम बंगालच्या Durgapur मध्ये तरूणाई करतेय Flavoured Condoms च्या मदतीने नशा
पश्चिम बंगाल पोलिसांनी अद्याप या विषयावर भाष्य केलेले नाही कारण त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की ते पदार्थाचा गैरवापर करणार्यांवर गुन्हा दाखल करू शकत नाहीत कारण भारतीय दंड संहितेमध्ये या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतेही विशिष्ट कायदे नाहीत.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे राहणाऱ्या काही विद्यार्थी आणि तरुणांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री अचानक वाढल्याने स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. अहवालानुसार, दुर्गापूरच्या विविध भागांमध्ये, जसे की दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिती आणि मुचीपारा, सी झोन आणि ए झोनमध्ये गर्भनिरोधक साधनाचा वापर वाढला आहे. दुर्गापूरमध्ये एक-दोन दिवसांत कंडोम शेल्फ बंद का आहेत, हे सांगणाऱ्या एका अधिकाऱ्याचा हवाला न्यूज18ने दिला आहे. एका स्थानिक दुकानदाराने कुतुहलाने त्याचा रोजचा ग्राहक असलेल्या एका तरुणाला विचारले असता त्याने दिलेल्या उत्तरामध्ये तो 'नशा' करण्यासाठी नियमितपणे कंडोम खरेदी करतो. असे समोर आले आहे.
कंडोम अॅडिक्शन म्हणजे काय?
न्यूज रिपोर्ट्स नुसार, दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी कंडोमचा माल आला की दिवसाला 3-4 पाकिटं विकली जात होती पण आता माल येताच तो संपतो. पण प्रश्न हा आहे की ही तरूण मंडळी नेमकी 'नशेखोरी' साठी त्याचा वापर कसा करतात? News18 च्या माहितीनुसार, शाळेची केमेस्ट्री विषयाची शिक्षिका Nurul Haque ने दिलेल्या माहितीनुसार, गरम पाण्यात कंडोम दीर्घकाळ भिजवल्याने मोठ्या ऑर्गनिक मोल्युक्युल्सचे अल्कोहोलयुक्त कम्पाऊंडमध्ये विघटन झाल्यामुळे नशा होते. हॉस्पिटल मध्ये काम करणार्या धीमन मंडल याने देखील दिलेल्या माहितीनुसार, कंडोममध्ये अॅरोमॅटिक कम्पाऊंड्स असतात त्यांचे अल्कोहल मध्ये रूपांतर होते. हेच कम्पाऊंड dendrites glue मध्ये आढळतात. अनेकजण dendrites glue देखील अॅडिक्शनसाठी वापरतात. Vegetable-Themed Condoms: व्हेजिटेबल-थीम कंडोममुळे आता सेक्स लाईफचा रोमांच आणखी वाढणार; लवकरच मार्केटमध्ये येणार .
सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडील अहवालांमध्ये कफ सिरप, पेंट, गोंद आणि आफ्टरशेव्ह यासह substance abuseच्या यादीमध्ये कंडोम जोडले गेले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी अद्याप या विषयावर भाष्य केलेले नाही कारण त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की ते पदार्थाचा गैरवापर करणार्यांवर गुन्हा दाखल करू शकत नाहीत कारण भारतीय दंड संहितेमध्ये या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतेही विशिष्ट कायदे नाहीत.