Photo : तब्बल 8 वर्षे चर्चमध्ये नन बनण्याचे शिक्षण घेतलेली तरुणी बनली पॉर्नस्टार
युडी पिनेडा (Photo credit : Instagram)

पॉर्न... समाजाचा बनत चाललेला एक अविभाज्य घटक. भारतात पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली असला तरी, यातूनही मार्ग शोधणारे अनेक महाभाग आपणाला दिसतील. जगभरात पॉर्न व्हिडीओजचे स्वतःचे असे फार मोठे मार्केट आहे. संपूर्ण जगातून अशा प्रकारच्या क्लिप्ससाठी बरीच मागणी असते. मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी यांमुळे सध्या तरुणांचा ओढा अशाप्रकारच्या व्हिडीओ बनवण्याकडे असलेला दिसून येतो. हा घटक आपल्या कारकिर्दीला 360 अंशामध्ये कसा काय बदलू शकतो याचे एक उदाहरण नुकतेच घडले आहे. तब्बल 8 वर्षे चर्चमध्ये नन बनण्याचे शिक्षण घेतल्यानंतर एक तरुणी चक्क पॉर्नस्टार बनली आहे. युडी पिनेडा (Yudi Pineda) असे या तरुणीचे नाव असून ती 22 वर्षांची आहे. (हेही वाचा : अभिनेत्रीला One night stand बद्दल विचारणाऱ्या व्यक्तीला मिळाले हे उत्तर)

 

View this post on Instagram

 

A post shared by yudy pineda (@yudy.pineda) on

पिनेडा ही कोलंबिया येथे राहते. शाळेत असताना एकदा एका ‘नन’ला पाहून पिनेडालाही नन बनण्याची इच्छा निर्माण झाली. त्यानंतर तिने एका कॉन्वेंटमध्ये तब्बत 8 वर्ष नन बनण्याचे ट्रेनिंग घेतले. चर्चमधील शिक्षणानंतर तिला एका ठिकाणी नोकरीही मिळाली. पिनेडाने नेस्लेसाठी काम सुरु केले. मात्र याचदरम्यान पॉर्न चित्रपटांमधील भूमिकांची निवड करण्याचे काम करणाऱ्या जुआन बस्टो (Juan Busto) शी तिची भेट झाली, आणि इथूनच तिच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

याबाबत युडी म्हणते, 'सुरुवातीला हे थोडे कठीण होते. मला याबाबत वाईटही वाटले होते. पण आता सर्वकाही सुरळीत चालू आहे. आताही मी नेहमीच चर्चमध्ये जाते. तिथल्या वातावरणात मला बरे वाटते.  मी कधीच शुक्रवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणे, चर्चमधील लोकांना भेटणे अथवा रविवारचा चर्चमधील मास चुकवत नाही’.

 

View this post on Instagram

 

ME ENCANTA SER COMO SOY CON MIS ERRORES Y MIS ACIERTOS ESTOY EN COMPLETO APRENDIZAJE SIEMPRE

A post shared by yudy pineda (@yudy.pineda) on

सुरुवातीला या कारकिर्दीसाठी युडीला फारच विरोध झाला होता. मात्र ती आपल्या मतावर ठाम होती. तिच्या मते पॉर्नस्टार असणे हेदेखील एक काम आहे आणि त्यात काही गैर नाही.