Close Call! बंगळुरुतील बन्रेरघट्टा राष्ट्रीय उद्यानात सफारीसाठी आलेल्या प्रवाशाची गाडी दाताने घेचतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल (Video)
परंतु काही वेळेस जंगल सफारी भीतीदायक सुद्धा ठरु शकते.
जर तुम्ही वाइल्ड लाइफ सफारीवर जाण्याचा विचार करत आहात का? तसेच तेथील वन्यप्राण्यांना जवळून पाहण्याची सुद्धा आपल्याला उत्सुकता असते. परंतु काही वेळेस जंगल सफारी भीतीदायक सुद्धा ठरु शकते. या सफारीदरम्यान अचानक समोर आलेला प्राणी पाहून तुमची घाबरगुंडी उडते. त्यामुळेच वाइल्ड लाइफच्या गाड्यांवर नेहमी आपल्याला जाळ्या लावलेल्या दिसून येतात जेणेकरुन प्रवाशांचे संरक्षण केले जाईल. याच दरम्यान आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरु मधील बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील वाघाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांची गाडी एक वाघ दाताने घेचत असल्याचे कॅमेऱ्या कैद झाले आहे. याचा व्हिडिओ तुफान सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत असे दिसून येत आहे की, एक पर्यटक वाहन रस्त्यावर थांबले आहे. त्यावेळी एक बंगाल टायगर प्रजातीचा वाघ गाडीजवळ जातो. याच दरम्यान तेथे असलेल्या दुसऱ्या वाहनाने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात टिपला आहे. असे दिसते की, वाघ आपल्या दाताने गाडी पाठी खेचण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. पण गाडीमधील व्यक्ती कोणताही हालचाल करत नाही आहे. डेक्कन हेराल्ड यांनी दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, ही घटना काही महिन्यांपूर्वीची आहे. त्यावेळी पर्यटक सफारी वाहनाची बॅटरीच्या समस्येमुळे ते बंद झाले होते.(Viral Video: हत्ती आणि कुत्र्याची ही घट्ट मैत्री पाहून 'शोले' चित्रपटातील गाण्याची येईल आठवण, पाहा मजेशीर व्हिडिओ)
Tweet:
जर तुमच्या सोबत ही घटना घडली असती तर तुम्ही काय केले असते? काही युजर्सने व्हिडिओ पाहिल्यानंतर वाघाच्या ताकदीचा अंदाज लावला आहे. परंतु या वाघांना रेक्सू केले गेले असून त्यांना कैदेत ठेवले जाते. त्यामुळेच ते आक्रमक स्वरुपात वागत नाहीत. परंतु वाहन पाहिल्यानंतर त्यांची अधिक उत्सुकता वाढली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.