China to Look for Aliens: चीन सप्टेंबरपासून सुरु करणार एलियन शोधण्याचे काम; 'या' मोठ्या दुर्बिणीची घेणार मदत, SETI च्या शास्त्रज्ञांची माहिती

चीन आता चक्क परग्रहवासी लोकांचा (Aliens) शोध घेण्यास सुरूवात करणार आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार करण्याच्या आरोपाचा सामना करीत असलेला चीन (China), आता एका नव्या मोहिमेला सुरुवात करत आहे. चीन आता चक्क परग्रहवासी लोकांचा (Aliens) शोध घेण्यास सुरूवात करणार आहे. यासाठी चीन आपल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीची (Telescope) मदत घेईल. एक्स्ट्रास्टेरिस्ट्रियल इंटेलिजन्स (SETI) च्या वैज्ञानिकांनी एलियनचा शोध घेण्यासाठी तयारीदेखील सुरू केली आहे. एक्स्ट्रास्टेरिस्ट्रियल इंटेलिजेंस शोधाचे नेतृत्व करणारे प्रमुख शास्त्रज्ञ झांग टोंजी म्हणाले की, अंतराळातील एलियंस शोधण्यासाठी 500 मीटर Aperture Spherical Telescope (FAST) वापरण्याची योजना आखली जात आहे.

अधिकृतपणे, चिनी शास्त्रज्ञ यावर्षी सप्टेंबरपासून अंतराळातील एलियंसचा शोध सुरू करणार आहेत. FAST दुर्बिण तयार करण्याचे काम 2011 मध्ये सुरू झाले, जे वर्ष 2016 मध्ये पूर्ण झाले. या दुर्बिणीच्या वापराला यंदा जानेवारीमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. एक्स्ट्रास्टेरियलियल इंटेलिजन्सच्या शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामध्ये ते FAST दुर्बिणीचा वापर कसे करतात हे सांगितले होते. अंतराळातून पृथ्वीवर येणाऱ्या परग्रहवासी लोकांचे संकेत शोधण्यात मदत करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी प्रथम रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे उद्भवणारे अडथळे दूर करण्याचे काम केले. (हेही वाचा: सूर्याचा पृष्ठभाग कसा दिसतो पाहिलात काय? पहिल्यांदाच स्पष्ट फोटो; जणू मधमाशीचे पोळेच)

चिनी शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, या दुर्बिणीच्या सहाय्याने ते एलियंसशी संवाद साधू शकतील. शास्त्रज्ञ पृथ्वीवरून येणारे सर्व सिग्नल्स फिल्टर करुन, दूर अंतरावरून येणारे संकेत शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनच्या SETI प्रकल्पातील सिनियर शास्त्रज्ञ झांग टोंगजी म्हणाले की, परदेशी शोधण्याचे अभियान यावर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होईल. या प्रकल्पामुळे जगातील इतर प्रकल्पांना कोणतीही अडचण येणार नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif