China: वॉटर पार्क मधील Wave Pool मध्ये त्सुनामी एवढी मोठी लाट; तांत्रिक बिघाडामुळे 44 जण जखमी (Watch Video)

चीन मध्ये मंचुरिया येथील शुईयून वॉटर पार्कमध्ये वेव्हपुलच्या तांत्रिक बाबीत काहीसा बिघाड झाल्याने त्सुनामी इतक्या मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या, अचानक घडलेल्या या प्रसंगात पुलमधील 44 जण जखमी झाल्याचे समजत आहेत.

China Water Park Accident (Photo Credits: Twitter)

समुद्राच्या लाटांमध्ये मनसोक्त भिजण्याची इच्छा असतानाही अनेकदा सुरक्षेच्या कारणास्तव हा पर्याय धोकादायक ठरू शकतो. ही आवड आणि त्याला जोडून येणारी चिंता लक्षात घेत अलीकडे अनेक वॉटर पार्क (Water Park) च्या स्विमिंगपूल (Swimming Pool)  मध्ये कृत्रिम लाटा तयार करून वेव्हपूल (Wave Pool) ची बांधणी करण्यात आली आहे. पण चीन (China) मध्ये अलीकडेच समोर आलेल्या एका घटनेत सुरक्षेची तरतूद म्हणून बनवण्यात आलेला हा पर्याय पर्यटकांना चांगलाच महागात पडल्याचे समजत आहे. मंचुरिया (Manchuria) येथील शुईयून वॉटर पार्कमध्ये वेव्हपुलच्या तांत्रिक बाबीत काहीसा बिघाड झाल्याने त्सुनामी (Tsunami) इतक्या मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या, अचानक घडलेल्या या प्रसंगात पुलमधील 44 जण जखमी झाल्याचे समजत आहेत.एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्सुनामी आल्याप्रमाणे लाट येताना दिसत आहे. लाट इतकी मोठी होती की, काहीजण अक्षरक्ष: पुलाच्या बाहेर फेकले गेले

पहा कॅमेऱ्यात कैद झालेला थरार

हे ही वाचा- BMC घडवणार Water Park मध्ये यंदा मुंबई पालिका शाळा विद्यार्थ्यांना मोफत सहल 

दरम्यान , वॉटर पार्कच्या अधिकाऱ्यांनी असोसिएट प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. याआधी राईड ऑपरेटर नशेत होता अशी माहिती माध्यमांकडून दिली जात होती. तूर्तास तपासाच्या कारणास्तव वॉटर पार्क बंद करण्यात आलं आहे.