Chhindwara Hospital Corona Patient Viral Video: 'करोना से नही, पंखे से डर लगता है साहब'; छिंदवाडा येथील COVID 19 रुग्णाची फॅन बदलण्यासाठी आर्जव

हा व्हिडिओ छिंदवाडा (Chhindwara) येथील एका रुग्णालयातील असल्याचे सांगितले जात आहे. या कोरोना रुग्णास कोरोनामुळे भीती वाटत नाही तर रुग्णालयातील पंख्यामुळे भीती वाटते.

Corona Patient Viral Video | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झालेल्या एका रुग्णाचा रुग्णालयातील अत्यंत धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) पुढे आला आहे. हा व्हिडिओ छिंदवाडा (Chhindwara) येथील एका रुग्णालयातील असल्याचे सांगितले जात आहे. या कोरोना रुग्णास कोरोनामुळे भीती वाटत नाही तर रुग्णालयातील पंख्यामुळे भीती वाटते. या रुग्णाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तोंडाला मास्क लावलेला आणि अत्यंत अत्यावस्थ स्थिती असलेला कोरोना रुग्ण 'कोरोना से नही, पंखे से डर लगता है (Corona Se Darr Nahi Lagta, Fan Se Lagta Hai). कोई ये पंखा तो बदलो यार', असा अर्जव करताना व्हिडिओत दिसतो. कोरोना आगोदर हा पंखाच मला मारून टाकेल असाही तो म्हणतो.

छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या रुग्णाने कोरोना पासून नव्हे तर रुग्णालयातील पंख्यापासून आपला बचाव व्हावा अशी विनंती केली आहे. या रुग्णाने व्हिडिओत म्हटले आहे की, आपण रुग्णालय प्रशासनाला वारंवार विनंती केली. परंतू, अनेकदा विनंती करुनही रुग्णालय प्रशासनाने हा पंखा बदलला नाही. या पंख्याकडे पाहून रात्र रात्र झोप येत नाही. असे वाटते की कोरोनाआधी हा पंखाच मला मारुन टाकेन. या रुग्णाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, 'दोन कानाखाली खाशील,' ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यानी दिले उत्तर; पहा व्हायरल व्हिडिओ)

व्हिडिओत दिसते की, कोरोनामुळे अत्यावस्त असलेला रुग्ण रुग्णालयाती एका कक्षात उपचार घेत आहे. हा रुग्ण ज्या कक्षात उपचार घेत आहे त्या कक्षाच्या छताला एक पंखा आहे. धक्कादायक असे की हा पंखा भवऱ्यासारखा फिरतो आहे. रुग्णच काय हा पंखा व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीच्याही अंगावर काटा आणतो. त्यामुळे या व्हिडिओतील दाहकता अधिक वाढली आहे. रुग्णालयातील ही अवस्था पाहून चौफेर टीका होऊ लागली आहे.