Baby Goat Born With Human-Like Face: शेळीला जन्मले मानवी तोंडवळा असेले पिल्लू, चंद्रपूर जिल्ह्यातील Chek Beradi गावातील घटना (Watch Video)

शेळीचे (Goat) मानवी तोंडवळा असलेले हे करडू (Baby Goat) गाव आणि हळूहळू तालुक्यासह जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

Baby Goat With Human-Like Face | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी (Gondpipri Taluka) तालुक्यातील चेक बेरडी (Chak Beradi Village) गावात एका शेळीने चक्क मानवी चेहऱ्याशी (Human Face) साधर्म्य असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. शेळीचे (Goat) मानवी तोंडवळा असलेले हे करडू (Baby Goat) गाव आणि हळूहळू तालुक्यासह जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. गावामध्ये अशा प्रकारचे कोकरु पहिल्यांदाच जन्माला आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मात्र, अशा घटना दुर्मिळ असतात आणि हे दुर्मिळ घटक फार काळ जीवसृष्टीशी जमवून घेऊ शकत नाही. त्यामुळे या कोकराचा जन्मानंतर काहीच वेळात मृत्यू झाला. असे असले तरी, या कोकराची ख्याती सोशल मीडियावरही पसरली असून, त्याचा एक व्हिडिओही व्हायरल (Viral Video) झाला आहे. जो पाहून सोशल मीडिया वापरकर्ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

चेक बेरडी गावात खळबळ

चंद्रपूर जिल्ह्यातील चेक बेरडी गावात आत्राम कुटुंबीय राहतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. सोबतच ते शेळीपालनही करतात. या आधीही त्यांच्याकडील अनेक शेळ्या व्यायल्या आहेत. निसर्गनियमाने या शेळ्यांच्या पोटी नर किंवा मादी यांना जन्म दिला आहे. ज्याला अनुक्रमे 'बोकड' किंवा 'पाट' म्हणतात. पण, आजवरच्या इतिहासात त्यांच्याकडे शेळीचे पिल्लू प्रथमच अशा काहीशा विचित्र प्रकारे जन्माला आले आहे. या पिल्लाचा चेहरा एखाद्या वृद्ध माणसासारखा दिसतो आहे. विशेष म्हणजे या पिल्लाला दाढी, माणसासारखे डोळे आणि चेहराही माणसासारखाच लाभला होता. मात्र, जन्मताच हे पिल्लू अतिशय कृष होते. त्यामुळे त्याच्या जगण्याची शक्यता बरीच कमी होती. गावकऱ्यांना कोकराबाबत माहिती कळताच त्यांनीक आत्राम यांच्या घराकडे धाव घेतली. (हेही वाचा, Goat's Eye Kills Man: बकऱ्याच्या डोळा, बेतला जीवावर; एकाचा मृत्यू; छत्तीसगड राज्यातील घटना)

पाहा व्हिडिओ

प्राप्त माहितीनुसार, आत्राम यांच्या शेळीने दोन कोकरांना जन्म दिला. त्यापैकी एक कोकरु हे अतिशय सुदृढ आणि निटनेटके होते. जन्माला आलेली सामान्य कोकरं दिसतात तसेच हेसुद्धा होते. दुसरे मात्र याहून काहिसे निराळे होते. त्याच्या शरीराची ठेवण इतर शेळीच्या कोकरांसारखीच असली तरी, चेहऱ्यात मात्र वेगळेपण होते. ज्यामुळे हे कोकरु चर्चा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. असे असले तरी, जन्मत:च हे कोकरु अत्यंत कृष होते. त्यामुळे त्याची जगण्याची शक्यता जन्मापासूनच कमी होती. तरीदेखील आत्राम कुटुंबीयांनी ते जीवंत राहावे यासाठी प्रयत्न करुन पाहिले. पण, त्यात त्यांना यश आले नाही. अखेर या कोकराला गावच्या हद्दीमध्ये जमिनीत पुरण्यात आले. दरम्यान, डॉक्टर आणि सृष्टीवरील वेगवेगळे जीव आणि प्राण्यांचा अभ्यास करणारे अभ्यासकही सांगतात. मादीच्या गर्भात झालेल्या काही जनुकीय गुंतागुंतीमुळे कधी कधी विचित्र गर्भाला जन्म दिला जातो. पण हे गर्भ पुढे फार काळ टिकत नाही. जसे की, या आधी दोन डोक्यांचा साप, दोन तोंडाचा बेडूक पाहायला मिळाले आहेत. पण त्यांचे या सृष्टीशी जमवून घेण्याचे प्रमाण फारच कमी म्हणजे नाही असेच राहिले आहे, असे अभ्यासक सांगतात.