केंद्र सरकार COVID-19 Relief Fund देत असल्याचा WhatsApp Message व्हायरल; जाणून घ्या PIB Fact Check चा खुलासा
यात केंद्र सरकार देशातील जनतेला फेज 4 कोविड-19 रिलिफ फंड देत असल्याचे म्हटले आहे. 'Government support for COVID-19' या टायटलने हा मेसेज व्हायरल होत असून फंड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन या मेसेजद्वारे करण्यात आले आहे.
सोशल मीडिया माध्यमांमध्ये सध्या एक मेसेज वेगाने पसरत आहे. यात केंद्र सरकार देशातील जनतेला फेज 4 कोविड-19 रिलिफ फंड (Phase 4 COVID-19 Relief Fund) देत असल्याचे म्हटले आहे. 'Government support for COVID-19' या टायटलने हा मेसेज व्हायरल होत असून फंड मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन या मेसेजद्वारे करण्यात आले आहे. यासाठी 'website named cutt.ly' या वेबसाईटची लिंकही देण्यात आली आहे. कोविड-19 संकटात हा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांचा पुरता गोंधळ उडला आहे.
या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, "सरकारकडून देण्यात येणाऱ्या फेज 4 कोविड-19 रिलिफ फंडसाठी अप्लाय करा. घाई करा. यासाठी केवळ काही सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही संधी सोडू नका." त्याचबरोबर या मेसेजमध्ये या संधीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक लिंकही शेअर करण्यात आली आहे. (PIB Fact Check: WHO कडून कोरोना खरंच सीझनल वायरस असल्याचा दावा? पहा या वायरल मेसेज वर करण्यात आलेला खुलासा)
या व्हायरल मेसेजाचा खुलासा पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) केला आहे. रिलिफ फंड बद्दलचा मेसेज खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. त्याचबरोबर अशा फॉरवर्ड मेसेजेसवर विश्वास ठेऊ नका आणि अशा फेक वेबसाईटवर तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका, असा संदेशही पीआयबीने दिला आहे.
यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक फेक मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोरोना संकटकाळात याचा वेग आणि प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच फेक मेसेजला बळी पडण्याचा आणि सावधानतेचा इशारा सरकारकडून वारंवार देण्यात येत आहे.