Pet Dog Brutally Beaten in Elevator: सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्यास बेदम मारहाण, गुरुग्राम येथील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Watch Video)
प्राप्त माहितीनुसार ही घटना गुरुग्राम येथील सेक्टर 54 मधील ऑर्किड गार्डन्स सोसायटी, सनसिटी येथे एका लिफ्टमध्ये घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.
पाळीव कुत्र्यासोबत सोसायटीच्या लिफ्टमध्ये अमानूष वर्तन केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना गुरुग्राम येथील सेक्टर 54 मधील ऑर्किड गार्डन्स सोसायटी, सनसिटी येथे एका लिफ्टमध्ये घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, कुत्र्यास घेऊन फिरणारा एक व्यक्ती हातातील सोनेरी रंगाच्या लोखंडी वस्तूने कुत्र्यास बेदम मारहाण करतो आहे. ही घटना 9 मे रोजी घडलेल्या या घटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला जात आहे.
कुत्र्याला बेदम मारहाण
प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार, व्हिडिओत दिसणारा व्यक्ती डॉग वॉकर आहे. जो भाड्याने घेतलेला कुत्रा फिरवून आणतो. त्याच कामासाठी जात असताना तो कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन आला आणि त्याला बेदम मारहाण करु लागला. विदित शर्मा यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया X वर शेअर केले आणि अशा घृणास्पद वर्तनावर कारवाई करण्याचे आवाहन केले. प्राण्यांसोबत घडणाऱ्या क्रूरतेच्या वाढत्या घटनांबद्दल चिंताही त्यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, Research On Dogs: कुत्र्यांना समजतो संज्ञांचा अर्थ, प्रतिमाही असतात ज्ञात; नव्या संशोधनात खुलासा)
सोशल मीडिया पोस्ट
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना शर्मा यांनी म्हटले की, "मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून थोडेसे लक्ष द्यायला हवे. अशा प्रकारे प्राण्यांवर होणारी क्रूरता पाहून त्रास होतो. दरम्यान, लक्ष विचलीत करणाऱ्या या व्हिडिओने सोशल मीडियावर संतापाची लाट आली आहे. अनेकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वापरकर्त्यांनी घटनेबाबत धक्का बसल्याचे सांगत तिरस्कार व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Viral Video: उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी कुत्रा बसला फ्रीजमध्ये, प्राण्याची ही युक्ती पाहून तुम्हालाही येईल हसू)
व्हिडिओ
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली होती. पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकमध्ये उपारासाठी आलेल्या चार कुत्र्यांना एका कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली होती. त्याही वेळी सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता. अशीच आणखी एक घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चंचवड नजीक सांघवी शहरात घडली होती. येथे अज्ञात व्यक्तीने भटक्या कुत्र्याला पकडून त्याचे दोन्ही डोळे सळी घालून फोडण्या आले होते. ज्यामुळे कुत्र्याची दृष्टी गेली होती. त्याचा तडफडून मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत एका व्यक्तीने केवळ गंमत म्हणून आणि युट्युबवर पेजविव्ह मिळविण्यासाठी कुत्र्याच्या पाठीला गॅसचे फुगे बांधून त्याला आकाशात सोडले होते. एका घटनेत तर कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची माळ बांधून त्याला पळविण्यात आले होते. अशा धक्कादायक घटनांनी समाजातील विकृती अनेकदा पुढे आली आहे.