CarryMinati on Bigg Boss 14 Funny Memes and Jokes: कॅरी मिनाटी सलमान खान च्या बिग बॉस शो मध्ये सहभागी होण्याची माहिती मिळताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!
या माहितीनंतर नेटकऱ्यांनी फनी मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
बिग बॉस (Bigg Boss) या लोकप्रिय रियालिटी शो च्या 14 व्या सीजनची घोषणा झाली आहे. सलमान खानच्या या शो ला रोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला युट्युबर कॅरी मिनाटी (CarryMinati) उर्फ अजय नागर (Ajey Nagar) हा बिग बॉस मध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर नेटकऱ्यांनी फनी मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. यंदाच्या 14 व्या सीजनच्या स्पर्धकांची अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु, युट्युब स्टार कॅरी मिनाटी या शो मध्ये सहभागी होत असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, कॅरी मिनाटी हा मुंबईत आला असून तो सध्या क्वारंटाईन आहे. 14 दिवसांचा क्वारंटाईन पिरेड संपल्यानंतर कॅरी मिनाटी बिग बॉसच्या टीमला जॉईन करेल. कॅरी मिनाटीच्या चाहत्यांना या गोष्टीचा आनंद झाला असून उपहासात्मक मीम्स शेअर करत ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
यावर्षी युट्युब विरुद्ध टिकटॉकच्या रोस्ट व्हिडिओमध्ये टिकटॉकवरील cringe content वर व्हिडिओ बनवल्यानंतर कॅरी मिनाटीची प्रसिद्धी वाढत गेली. या व्हिडिओला मिलियन्समध्ये व्ह्युज मिळाले होते. परंतु, युट्युब पॉलिसीची उल्लंघन झाल्यामुळे या दिवसांनंतर हा व्हिडिओ युट्युबवरुन काढून टाकण्यात आला. मात्र आता खुद्द कॅरी मिनाटी बिग बॉस जॉईन करणार असे कळताच त्याच्या बिग बॉस रोस्टिंगची आठवण त्याला चाहत्यांकडून करुन देण्यात येत आहे.
पहा व्हायरल होणारे मीम्स:
कॅरी मिनाटीने युट्युब विरुद्ध टिकटॉक व्हिडिओमध्ये टिकटॉकर आमिर सिद्धीकी आणि त्याच्या साथीदारांना cringe content, बॉडी लॅग्वेज, आऊटफिट यावरु त्याला ट्रोल केले होते. कॅरी मिनाटीने जर बिग बॉस जॉईन केले तर बिग बॉसच्या घरातील ड्रामा तो कसा हाताळणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.