Hydroxychloroquine युक्त कलौंजी बियांमुळे कोरोना व्हायरस बरा होऊ शकतो? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजची सत्यता

सध्या जस जसा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका वाढत आहे, तस तसे याबाबतचे खोटे मेसेजेस (Fake Message) व्हायरल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना विषाणू सध्या जगामध्ये थैमान घालत आहे

Kalonji Seeds can cure coronavirus (Photo Credits: Facebook and File Image)

सध्या जस जसा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका वाढत आहे, तस तसे याबाबतचे खोटे मेसेजेस (Fake Message) व्हायरल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना विषाणू सध्या जगामध्ये थैमान घालत आहे, मात्र अजूनही यावर कोणतेही औषध अथवा लस सापडली नाही. अशात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला गेला आहे की, कलौंजी बियां (Kalonji Seeds) मुळे कोरोना व्हायरस बरा होतो. कलौंजीमध्ये 100 टक्के हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) आहे व हा घटक कोरोना व्हायरस संसर्गाच्या उपचारात प्रभावी आहे. म्हणूनच कलौंजीच्या सेवनाने कोरोना व्हायरस ठीक होतो, असा उल्लेख या मेसेजमध्ये आहे. मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नुकतेच अमेरिकेने भारताकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची मागणी केली. त्यानंतर हा संदेश व्हायरल व्हायला सुरुवात झाली. यामध्ये लिहिले आहे की मधासोबत अर्धा चमचा खाल्ली गेलेली कलौंजी कोरोना व्हायरससचा प्रतिबंध करू शकते. बघता बघता हा मेसेज सोशल मिडियावर व्हायरस व्हायला सुरुवात झाली. यामध्ये असणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळे हा साथीचा आजार बरा होऊ शकतो असे या मेसेजमध्ये सांगितले गेले आहे.

तर या मेसेजमधील दाव्याची तथ्यता तपासण्यासाठी दोन गोष्टींबाबत विचार करावा लागेल. पहिले म्हणजे कलौंजीमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहे का नाही? व दुसरा म्हणजे जर असेल तर तो कोरोना व्हायरस ठीक करू शकतो? कलौंजी हा भारतीय कुटुंबातील स्वयंपाक घरात वापरला जाणारा लोकप्रिय घटक आहे. स्वयंपाक करताना अन्नाची चव वाढवण्यासाठी याचा वापर होतो तसेच इतरही अनेक शारीरिक समस्यांवर कलौंजी हा रामबाण उपाय सांगितला आहे. शरीरासाठी लागणारे अनेक पोषक घटक यामध्ये आहेत, मात्र यामध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहे का नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

अभ्यासानुसार, कलौंजीमध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, त्वचेचे आजार तसेच इतरही अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. अल्जेरियामधील एका अभ्यासानुसार, कलौंजीला कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याची क्षमता असलेली गोष्ट असे दर्शविले गेले आहे. परंतु हा फक्त एक प्रयोगशाळा अभ्यास आहे, याची विस्तृत चाचणी किंवा क्लिनिकल चाचणी झाली नाही. (हेही वाचा: वजन कमी करणे, केस गळती थांबवणे अशा अनेक गोष्टींवर रामबाण उपाय आहे 'कलौंजी'; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे)

Good Friday असुनही चर्च राहणार बंद,सेंट मायकल चर्चकडून Novena चे दाखवले जाणार लाईव्ह स्ट्रिमिंग : Watch Video

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन एक मलेरिया विरोधी औषध आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, या औषधाने कोरोना व्हायरससह अनेक व्हायरसवर अँटीव्हायरल प्रभाव दर्शविला आहे. मात्र, हे प्रयोग अद्याप संपलेले नाहीत आणि त्याबाबत अंतिम निष्कर्ष अजून येणे बाकी आहे. त्यामुळे कलौंजी किंवा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना व्हायरसवरील प्रभावी औषध आहे असे समजणे चूक ठरेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now