Bullock Cart Race Exciting Video: बैलगाडा शर्यतीदरम्यान बैल आणि गाडा शिरले पाण्यात, थरारक प्रसंग, Viral व्हिडिओ पाहून चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका
एका समान रेषेत. माईकवरुन घोषणा झाली आणि झेडेकऱ्याने झेंडा फडकावला. झाले. बैलगाड्या सुटल्या. प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्या आणि गोंधळ सुरु केला. अपेक्षीत होते की बैलगाड्या सरळ रेषेत धावपट्टीवरुन धावाव्यात. पण घडले भलतेच दोन बैलगाड्यांनी धापट्टी सोडली आणि त्या थेट पाण्यात शिरल्या.
Bullock Cart Race Viral Video: टाळ्या, शिट्या आणि पावलोपावली थरार दाखवणारी बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) म्हणजे अबाल वृद्धांच्या उत्साहाचा केंद्रबींदू. धावपट्टीवर सरळ रेषेत धावणाऱ्या बैलगाड्या (Bullock Cart) पाहणे हा जणू एक सोहळा असतो. पण, काही क्षणांचा हा आनंद अनेकदा धोकादायक वळण घेतो आणि भलतेच काहीतरी (Bullock Cart Accident) होऊन बसते. अशा अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आताही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरे तर हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणावरचा आहे याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, व्हिडिओ पाहून अनेकांच्या अगाचा थरकाप उडाला हे मात्र वेगळे सांगायालच नको.
त्याचे झाले असे. धावपट्टीवर बैलगाड्या उभे राहिल्या. एका समान रेषेत. माईकवरुन घोषणा झाली आणि झेडेकऱ्याने झेंडा फडकावला. झाले. बैलगाड्या सुटल्या. प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्या आणि गोंधळ सुरु केला. अपेक्षीत होते की बैलगाड्या सरळ रेषेत धावपट्टीवरुन धावाव्यात. पण घडले भलतेच दोन बैलगाड्यांनी धापट्टी सोडली. बैलगाडाचालक आपले सर्व कसब पणाला लावून गाडीवर आणि बैलांवर नियंत्रण ठेवायचा पुरेपूर प्रयत्न करत होते. पण त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही. दोन बैलगाड्या धावपट्टी सोडून धावू लागल्या. या दोन्ही बैलगाड्या शर्यतीच्या ठिकाणापासून बाजूला असलेल्या एका तलावाच्या दिशेने धावल्या. माईकवरुन सूचना केल्या जात होत्या. बैलगाडी धरा. बैल पाण्यात जातील. पण आजूबाजूच्या मंडळींना बैलगाडीजवळ पोहोचेपर्यंत कार्यक्रम झाला होता. दोन्ही बैलगाड्या पाण्यात शिरल्या होत्या. (हेही वाचा, Ambernath Firing Video: अंबरनाथमध्ये अंदाधुद गोळीबार, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल)
ट्विट
पाण्यात शिरलेल्या बैलगाड्यांना पकडण्यासाठी संबंधित बैलगाडा मालकांच्या तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या. ते पोहून आंतर पार करु लागले. पण शेवटी बैलांचा वेग आणि माणसाच्या पोहण्याचा वेग. यात बरेच अंतर असते. त्यामुळे बैल पुढेच जाऊ लागले. अखेर बैलांच्या नाकात पाणी शिरले तेव्हा कुठे बैलांची गती कमी आली. तोवर तरुणही बैलापर्यंत पोहोचले होते. त्यांनी बैलगाडी ताब्यात घेतली. बैलांवर नियंत्रण मिळवले आणि त्यांना काठाला आणले. या सर्व थरारात दुर्घटना होण्याची शक्यता अधिक होती. कारण बैल पाण्याच्या मध्यभागी गेले होते. यात बैलगाडा चालकाला पोहता येत नसते तर त्याचे प्राण जाण्याची शक्यता कैक पटींनी वाढली होती. मात्र, योग्य वेळी अनेक घटनाय योग्य पद्धतीने घडल्या. म्हणून अनुचीत घटना टळली. आपणही बैलगाड्यांचा हा थरार येथे पाहू शकता.