अबब! 15 कोटी रुपयांहूनही महाग आहे हा रेडा; 6 फूट उंच तर, 14 फूट लांब, वजन फक्त 1300 किलो

मुर्रा जातीचा हा रेडा तब्बल 6 फूट उंच तर, 14 फूट लांबत तर वजन तब्बल तेराशे किलोग्रॅम (1,300 Kg) इतके आहे. या 'भीम' (Bheem) असे या रेड्याचे नाव आहे. हा रेडा या प्रदर्शनात दुसऱ्या वेळा आला आहे. त्याचे सध्याचे वय पावणेसात वर्षे इतके आहे. अतिकशय देखण्या आणि महाकाय अशा रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि प्रेक्षकांची रीघ लागली आहे.

Buffalo ‘Bheem’ | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

राजस्थान (Rajasthan State) राज्यातील अजमेर (Ajmer District) जिल्ह्यातील पुष्कर येथे सुरु असलेल्या कृषीप्रदर्शन (Pushkar Agriculture Exhibition) आणि पशू मेळाव्यात एक रेडा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मुर्रा जातीचा हा रेडा तब्बल 6 फूट उंच तर, 14 फूट लांबत तर वजन तब्बल तेराशे किलोग्रॅम (1,300 Kg) इतके आहे. या 'भीम' (Bheem) असे या रेड्याचे नाव आहे. हा रेडा या प्रदर्शनात दुसऱ्या वेळा आला आहे. त्याचे सध्याचे वय पावणेसात वर्षे इतके आहे. अतिकशय देखण्या आणि महाकाय अशा रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि प्रेक्षकांची रीघ लागली आहे.

दिसायला अतिशय महाकाय असा हा रेडा घेऊन जोधपुर येथील जवाहर लाल जांगीड आणि त्यांचे पूत्र अरविंद जांगिड हे प्रदर्शानत सोमवारी पोहोचले. अरविंद यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना सांगितले की, भीम हा रेडा साडेचार वर्षे वयाचा असताना त्याला उदयपूर येथील एका अॅग्रोटेक परिषदेत सादर करण्यात आला. तेव्हा भीम भारताचा सुपर युवरा चँम्पीनय असलेल्या रेड्याल आव्हान देऊन आग्रक्रमाने आला. त्याला सर्वश्रेष्ठ पशू म्हणून त्या प्रदर्शनात मान मिळाला.

जांगिड यांनी पुढे सांगितले की, भीम याला आपण लहानपणापासून जपले आहे. त्याच्या खुराकावरही बारीक लक्ष दिले आहे. त्याच्या खुराकावर प्रतिमहिना एक लाख रुपे खर्च केले जातात. भीम याला प्रतिदिन एक किलो तुप, आर्था किलो लोणी आणि दोनशे ग्रा मध, 25 लीटर दूध, सुखा मेवा आदी खुराक दिला जातो.

अरविंद जांगिड यांनी दावा केल्यानुसार, भीम या रेड्याला 2016 मध्ये सर्वात पहिल्यांदा 60 लाख रुपये इतक्या किमतीची ऑफर मिळाली होती. मात्र, तेव्हा आम्ही त्याची विक्री केली नाही आणि आजही आम्ही त्याची विक्री करणार नाही आहोत. आज त्याची बोली वाढत वाढत चक्क 15 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भीम याला आपण विकू इच्छित नाही. कितीही किंमत आली तरी. आपण इथे आपला रेडा विकण्यासाठी नाही तर मुर्रा या प्रजातिच्या वाणाचे संरक्षण आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आलो आहोत असेही रेडा मालक आरविंद जांगिड सांगतात. (हेही वाचा, बिहार: कोंबड्याची हत्या, सात जणांवर गुन्हा दाखल, पोस्टमार्टमही झाले; पोलिसांकडून तपास सुरु)

अरविंद जांगीड यांनी सांगितले की, भारतात चांगल्या प्रजातीचे पशुधन आहे. मात्र, पैसा आणि साधनांची कमी असलेली उपलब्धता आदी कारणांमुळे चांगले ब्रीड तयार होत नाही. पुष्कर मेळ्यात या रेड्याचे समीनही उपलब्ध करुन दिले जात आहे. मुर्रा प्रजातीचा या रेड्याच्या सीमनला देशभरात प्रचंड मागणी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या मेळाव्यात सुमारे पाच हजारांहून अधिक पशू आहेत. यात उंड, घोडे आणि देशी-विदेशी प्रजातीच्या गाई, बैल, म्हशी आणि रेड्यांचाही समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now