ब्राझील: तुरुंगातून पळ काढण्यासाठी गुंडाने केला स्वत:च्या मुलीचा पेहराव, आरोपीला अटक

मात्र जेव्हा चेहऱ्यावरील खोटा चेहऱ्याचा पेहराव उतरवला जातो तेव्हा आरोपी नेमका कोण हे सिद्ध होते. असाच एक प्रकार ब्राझील (Brazil) येथील एका सराईत गुंडाने केला आहे.

Brazil: Drug Dealer tries to escape from jail (Photo Credits-Facebook)

चित्रपटात जसे चेहऱ्यावर एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीसारखा पेहराव करुन कलाकार फसवताना दिसून येतात. मात्र जेव्हा चेहऱ्यावरील खोटा चेहऱ्याचा पेहराव उतरवला जातो तेव्हा आरोपी नेमका कोण हे सिद्ध होते. असाच एक प्रकार ब्राझील (Brazil) येथील एका सराईत गुंडाने केला आहे.

तुरुंगातून चालाखीने पळ काढण्यासाठी एका गुंडाने अनोखी शक्कल लढवली आहे. क्लाउविनो दा सिल्वा उर्फ शॉर्टी असे या गुंडाचे नाव आहे. शॉर्टी हा रियो डी जेनेरियोच्या पश्चिम भागातील एका तुरुंगात बंद होता. शॉर्टी याने येथून पळ काढण्यासाठी त्याची 19 वर्षीय मुलगी सारखा पेहराव केला. परंतु शॉर्टी याने चेहऱ्यावर मुलीच्या चेहऱ्याचा मास्क घातला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. यामुळेच शॉर्टी पुन्हा पकडला गेला.(तब्बल 221 पुरुषांना डेट केल्यानंतर सुपर मॉडेलने केले चक्क कुत्र्याशी लग्न; टीव्ही शोमध्ये प्रसारित झाला लग्न सोहळा Video)

पोलिसांच्या मते शॉर्टीला त्याचा मुलीच्या चेहऱ्याचा मास्क घालून तेथून पळ काढायचा होता आणि मुलीला तुरुंगात ठेवायचे होते असा त्याचा प्लॅन होता. शॉर्टीसारख्या सराईत गुंडासह अन्य सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शॉर्टी याला मुलीचे पुरवण्यात आलेले कपडे हे एका गर्भवती महिलेमार्फत देण्यात आले होते. तुरुंगातील पोलीस अधिकाऱ्यांनी शॉर्टी याचे फोटोसुद्धा जाहीर केले आहेत. त्यामध्ये त्याने एक सिलिकॉन मास्क, विग, जीन्स आणि गुलाबी रंगाचे टीशर्ट असल्याचे दिसून येत आहे.