Binod Funny Memes and Jokes Are Trending on Social Media: पहा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेले धम्माल 'बिनोद' मिम्स आणि कसा सुरू झाला ट्रेंड!
मागील काही दिवसांपासून युट्युबर्सच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये कमेंट सेक्शनमध्ये स्पॅमिंग ट्रेंड ठरलेला हा #Binod आता ट्वीटरसह इतर सोशल मीडीया हॅन्डल्सवर देखील आता दिसायला लागला आहे.
युट्युब चॅनल स्ले पॉईंटच्या (Slayy Point Video) एका व्हिडिओमधून पुढे आलेला 'Binod' आता सोशल मीडियामध्ये सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. मागील काही दिवसांपासून युट्युबर्सच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये कमेंट सेक्शनमध्ये स्पॅमिंग ट्रेंड ठरलेला हा #Binod आता ट्वीटरसह इतर सोशल मीडीया हॅन्डल्सवर देखील आता दिसायला लागला आहे. अनेक ठिकाणी Who is Binod असा प्रश्न विचारत मजेशीत ट्वीट्स, मीम्स, जोक्स शेअर केले जात आहे. दरम्यान ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर देखील Binod ट्रेडिंग हॅशटॅगमध्ये आहे. Binod Funny Memes सोशल मीडियावर होतायत व्हायरल, पण कोण आहे हा 'बिनोद'? जाणून घ्या YouTube Comments मधील या Viral Trend बद्दल!
दरम्यान स्ले पॉईंट चॅनलच्या युट्युबरने भारतीय युजर्स कशाप्रकारे कमेंट्स करतात यावर एक मजेशीर व्हिडीओ बनवला होता. त्यामध्ये एकाने कमेट सेक्शनमध्ये केवळ त्याचं नव 'बिनोद' इतकंच पोस्ट केले होते. अशाप्रकारे अनेकजण प्रसिद्ध युट्युबर्सच्या लाईव्ह स्ट्रिमींगमध्ये केवळ स्वतःचं नाव पोस्ट करतात. या गोष्टीवरून 'Binod' या कमेंट्सचा पाऊस भारतातील अनेक युट्युबर्सच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमधील कमेंट सेक्शनमध्ये पडायला लागला. आता हा स्पॅमिंग ट्रेंड इतका मोठा झाला आहे की त्याचे मिम्स व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे.
Binod ची चर्चा
सर्वत्र Binod
बिनोदचा रूबाब
अनेकांना पडलाय प्रश्न
बिनोद मिम्स सध्या ट्रेडिंग आहे. त्यामुळे अनेकजण यामध्ये स्वतःची क्रिएटीव्ही वापरून मजेशीर जोक्स, मिम्स पोस्ट करत आहेत. सोशल मीडियात रातोरात अनेकजण स्टार झाले आहेत. आता या ट्रेंडमध्ये 'बिनोद'चा देखील समावेश झाला आहे.