बिहार: पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने 'या' व्यक्तीने चक्क टाटा नॅनो ला दिला हेलिकॉप्टरचा लूक; पहा व्हिडिओ
बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मिथलेश प्रसाद याने टाटा नॅनो कारला हेलिकॉप्टर सारखा लूक देण्याची कामगिरी केली आहे.
बिहार (Bihar) मधील एका व्यक्तीने एक अजब प्रकार केला आहे. बिहारमधील छपरा (Chhapra) जिल्ह्यातील मिथलेश प्रसाद याने टाटा नॅनो कारला (Tata Nano Car) हेलिकॉप्टर (Helicopter) सारखा लूक देण्याची कामगिरी केली आहे. ही कार दिसते तर अगदी हेलिकॉप्टरसारखी मात्र उडू शकत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथलेश पायलट होऊ इच्छित होता. मात्र शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मिथलेशचे हे स्वप्न अपूरेच राहिले. त्यामुळे आपल्या स्वप्नांना दुसरे रुप देण्याचा मिथलेशचा हा प्रयत्न आहे. नदीत अचानक तरंगायला लागली इमारत, बघ्यांच्या भुवया उंचावल्या (Watch Video)
टाटा नॅनोला हेलिकॉप्टर सारखा लूक देण्यासाठी त्याच्यावर पंख लावण्यात आले आहेत. पुढील आणि मागील भागही बदलण्यात आला आहे. कारमधील फक्त बाहेरील रुप नाही तर आतील स्वरुप देखील बदलण्यात आले आहे. कारच्या आतमध्ये मिथलेशने हेलिकॉप्टर सारखे बटण लावले आहेत. अशाप्रकारे मिथलेशने नॅनो कारचं रुपडं बदललं आहे.
पहा व्हिडिओ:
विशेष म्हणजे हेलिकॉप्टरचा लूक असलेल्या या कारचे भलतेच कौतुक होत आहे. आजूबाजूच्या भागात ही कार चर्चेचा विषय ठरत आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.