Barry Stanton’ X Account Suspended: कोण आहे बॅरी स्टँटन? ज्याचे X खाते झाले निलंबीत
वापरकर्त्याने अपमानास्पद टिप्पण्या आणि आक्षेपार्ह कार्टून शेअर केल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या वर्णद्वेषी पोस्टच्या मालिकेवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्यानंतर "Barry Stanton" (@barrystantonGBP) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका निनावी वापरकर्त्याचे खाते निलंबित केले आहे. वापरकर्त्याने अपमानास्पद टिप्पण्या आणि आक्षेपार्ह कार्टून शेअर केल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या एक्स हँडलवरुन भारतीयांना नकारात्मक पद्धतीने सादर करण्यात आणि संबोधण्यात आले होते. ज्यावर तीव्र प्रमाणावर टीका झाल्यानंतर एक्स द्वारे कारवाई करण्यात आली.
प्रक्षोभक मजकुरासाठी प्रसिद्धी मिळवत 1.8 लाखांहून अधिक फॉलोअर्स जमवणाऱ्या 'Barry Stanton' या X खात्यावर प्रचंड टीका झाली. या खात्यावरुन पोस्ट केली जाणारी सर्व सामग्री भारतीयांबद्दल वर्णद्वेशी टीप्पणी करणारी होती. या टीप्पण्या अत्यंत आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक होत्या. ज्यामध्ये भारतीयांना 'दुर्गंधीयुक्त' असे संबोधण्यात आले होते. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी शौच करणाऱ्या भारतीयांची वर्णद्वेषी व्यंगचित्रे दाखवण्यात आली होती. त्यानंतर शेकडो संतप्त वापरकर्त्यांनी पोस्ट फ्लॅग केल्या होत्या आणि X मालक एलोन मस्क यांना खात्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले होते.
शुक्रवार सकाळपासूनच 'Barry Stanton' खाते निलंबीत केले जावे यासाठी 'Suspended' हा हॅशटॅग ट्रेंण्डींग बनला होता. दरम्यान, भारतीयांना लक्ष्य करण्याबरोबरच, "बॅरी स्टँटन" खात्याने ज्यू आणि आफ्रिकन लोकांबद्दल द्वेषपूर्ण पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. एका पोस्टमध्ये, "काळ्या लोकांना कॉमेडी का वाटते फक्त मोठ्याने लोक ओरडतात?" असा आशय त्याने पोस्ट केला होता. अखेर अनेक वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींचा विचार करुन X ने त्याचे अकाऊंट निलंबीत केले.
X वरील खात्याच्या बायोनुसार, "बॅरी स्टँटन" हा ब्रिटिश नागरिक आणि पाच मुलांचा पिता असल्याचा दावा करतो. दरम्यान, यूकेच्या एका वेबसाइटने दिलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, खात्यावर वापरलेल्या प्रतिमा त्याच्या स्वत:च्या नसून भलत्याच व्यक्तीच्या आहेत. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, "बॅरी स्टँटन" हे एक बनावट खाते असू शकते. शक्यतो उदारमतवादी वैयक्तिक उपहास करणाऱ्या वर्णद्वेषी किंवा विनोद आणि इतर कोणाच्या तरी ओळखीमागे दडलेल्या अस्सल वर्णद्वेषाने तयार केले आहे. त्याच्या खात्याचे निलंबन होण्यापूर्वी त्याच्या अनेक पोस्टला वापरकर्त्यांनी प्रतिसाद दिला. उदाहरणार्थ, एका पोस्टसह, 4,000 पेक्षा जास्त रीट्विट्स प्राप्त झाले. धक्कादायक म्हणजे ही पोस्ट वर्णद्वेशी होती. त्याचे खाते निलंबीत केल्यावर अनेकांनी आनंद व्यक्त केला.