गोवा फिरताना बागा बीचजवळ Google Maps हमखास दाखवतो चूकीचा रस्ता, पर्यटकांसाठी गोवेकरांनी बनवलेलं खास बॅनर सोशल मीडियामध्ये व्हायरल

त्याबाबत बागा बीच परिसरात खास बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Baga beach road (Photo Credits: @tweesumz Twitter)

अनेकदा लोकं घराबाहेर पडताना गूगल मॅप्स (Google Maps) पाहून नेमका प्रवास कसा करायचा? कुठे करायचा हे ठरवतात. जगभरात हे एक भटकणार्‍या लोकांचं विश्वसनीय अ‍ॅप आहे. पण जरा थांबा तुम्ही गोव्यात (Goa)  फिरायचा प्लॅन करत असाल तर बागा बीच ( Baga Beach) या गोव्यातील एका लोकप्रिय बीचवर फिरताना तुम्हांला गूगल मॅप मदत करू शकणार नाही. त्याबाबत बागा बीच परिसरात खास बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहेत.

नॉर्थ गोव्यामध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत. देशी, परदेशी पर्यटक हमखास बागा बीचला भेट देतात. पण या बीच जवळून जाणारा रस्ता आणि हॉटेल्स या दरम्यान एक असा रस्ता आहे ज्या मार्गावर अनेक प्रवासी हमखास चूकतात आणि त्याच भागात फिरत राहतात. या परिसरात लोकांनी आता स्वतःचं एक बॅनर बनवलं आहे. यामध्ये 'गूगल मॅप तुम्हांला मूर्ख बनवत आहे. मागे वळा आणि डाव्या बाजूने पुढे जा. एक किमीच्या अंतरावर बागा बीच आहे.' असा खास बॅनर गोव्याच्या बाजारात दिसत आहे. आता गोव्यात सेल्फी काढणे पडू शकते महागात

ट्विटरवर काही युजर्सनी गूगल मॅप बागा बीच परिसरात खरंच चूकीचा मार्ग दाखवतो, हे माझ्यासोबत असं झालंय. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजर्सच्या ट्विटला तब्बल 200 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. त्यामुळे टू व्हिलरवरून गोवा भटकायला निघणार असाल तर बागा बीच परिसरात गूगल मॅप्सवर विश्वास न ठेवता स्थानिकांच्या मदतीने रस्ता विचारत पुढे जाण्यातच शहाणपण आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif